आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nepal Earthquake After 5th Day Live News In Marathi

भूकंपग्रस्त काठमांडू सोडण्याच्या तयारीत, चोरांचा सुळसुळाट, 27 अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू/नवी दिल्ली- विनाशकारी भूकंपाने काठमांडूत घरे आणि दुकाने-हॉटेल्स उजाड पडले आहेत. या हॉटेल्स, घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्याचे उघडकीस झाले आहे. याप्रकरणी 27 जणांना काठमांडू पोलिसांनी बुधवारी अटक केले आहे. अटक केल्या लोकांवर भूकंपाच्या भीतीने घरदार सोडून न‍िघून गेलेल्या पीडितांच्या घरात चोरी केल्याचे आरोप ठेवण्यात आल्याचे, काठमांडूचे पोलिस अधिकारी विज्ञानराज शर्मा यांनी सांगितले.

दुसरीकडे, नेपाळमधील मृतांचा अध‍िकृत आकडा 5057 वर पोहोचला असून 10915 लोक जखमी झाले आहे. 454769 लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सुमारे 25 हजार भूकंपग्रस्त काठमांडू सोडण्याच्या तयारीत आहेत.

नेपाळमधील विनाशकारी भूकंपाचा फटका 80 लाख लोकांना बसला. त्यापैकी 50 हजार गर्भवती महिला आहे. त्यांची स्थिती सर्वात खराव आहे. गर्भवती महिलांसाठी नैसर्गिक आपत्तीचा काळ सर्वात कठीण असतो. या काळात महिला आणि नवजातांचा मृत्यूदर 14 पट वाढण्याचा धोका असतो, असे संयुक्त राष्ट्रांनी (यूएन) दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे.

नेपाळमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारत सरकारने 'रेस्क्यू ऑपरेशन' वेगात सुरु केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नेपाळमधील स्थितीचा आढावा घेतला. नेपाळला सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचा मोदींनी पुनरुच्चार केला. भारतीय लष्कराने गोरखा रेजिमेंट्‍सला नेपाळमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डोंगराळ भागात चढाई करण्यात गोरखा जवान तरबेज असतात.

काठमांडूत सातमजली इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर अडकलेले 28 वर्षीय ऋषी कनाल यांना तब्बल तासांनंतर वाचवण्यात आले बचाव पथकाला यश आले. ऋषी अडकला होता त्या खोलीत मृतदेह होते. मदतीसाठी आलेल्यांची चाहूल लागल्यानंतर तो ओरडला. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बचाव पथकाने त्याला बाहेर काढले. ‘ऋषीची हिंमत पाहून आपण थक्क झाल्याची प्रतिक्रिया डॉ.अखिलेश श्रेष्ठ यांनी व्यक्त केली.
UPDATES:-

- यूपी सरकारच्या 110 बस काठमांडूला रवाना परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता Vikas Swarup ‏@MEAIndia यांचे ट्वीट

- भारतीय रेल्वेने दिल्ली एअरपोर्टवर सुरु केले रिझर्व्हेशन काउंटर. भूकंपग्रस्तांसाठी 722 तिकिट मोफत- रेल्वेमंत्री सुरेश प्रभु

- नेपाळमधील बंद पडलेले तीन विद्युत प्रकल्प सुरु

- नेपाळमधील भारतीय नागरिकांना घेऊन सहा बस उत्तरप्रदेशात रवाना. काठमांडूच्या मार्गावर ट्राफिक जाम

- 25 हजार भूकंपग्रस्त काठमांडू सोडण्याच्या तयारीत बस स्थानकावर दोन-तीन किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा. नेपाळ सरकारच्या व्यवस्थेविरोधात भूकंपग्रस्तामध्ये तीव्र संताप

- काठमांडूत तब्बल 80 तासांनंतर ढिगार्‍याखालून एकाला जिवंत बाहेर काढेले. फ्रान्स रेस्क्यू टीमचे वेगात मदतकार्य सुरु
- पंतप्रधान मोदींनी सकाळी साडे नऊ वाजता कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. त्यात नेपाळला मदतीची घोषणा होण्‍याची शकता आहे.

- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत अधिकार्‍यांकडून घेतला नेपाळमधील मदतकार्याचा आढावा. भूकंपग्रस्तांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल.

- भूकंपानंतर बेपत्ता असलेल्या दोन डॉक्टरांचा मृत्यू. दोन केरळमधील होते. काठमांडूतील रेड क्रॉस रुग्णालयात दोघे सुखरुप असल्याची आधी माहिती मिळाली होती.

- मदत कार्याला वेग- नेपाळ लष्कर. भारतीय लष्कराचे अमुल्य सहकार्य. नेपाळमधील 11 जिल्ह्यात बचावकार्य सुरु असून 9000 किलो खाद्य सामग्री नेपाळमध्ये दाखल झाली आहे. भारतीय जवानांनी‍ सात जिल्ह्यातील 703 जखमींना रुग्णालयात हलवले.

दुसरीकडे नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या 7.9 तीव्रतेच्या भूकंपाने भूगोलच बदलून टाकला आहे. काठमांडू दक्षिणेला तीन मीटर आणि भारतातील बिहारचा एक भाग 1 ते 10 फुटांनी सरकला असल्याचा दावा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. मात्र, माउंट एव्हरेस्टच्या उंचीत कुठलाही फरक पडलेला नाही.

भूकंपात मरण पावलेल्यांची अधिकृत संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. परंतु, भूकंपाचा केंद्र असलेल्या काठमांडूमध्ये हजारों लोक अजूनही ढिगार्‍याखालीच आहेत. त्यामुळे या भीषण भूकंपातील मृतांचा आकडा 15 हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूकंपांच्या भीतीमुळे भूकंपग्रस्तांना चौथ्या दिवसाची रात्र (मंगळवारची) मैदानावरच काढावी लागली.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, भूकंपाच्या धक्क्याने बिहारचा काही भाग नेपाळखाली गेला...