आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nepal Earthquake : Couple Married Despite Loosing Everything

NEPAL: गर्लफ्रेंडला ढिगा-यातून काढले आणि मंदिरात केला विवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : अमिता आणि नरेंद्र - Divya Marathi
फाइल फोटो : अमिता आणि नरेंद्र
काठमांडू - अमिता नेपाळी आणि और नरेंद्र तिवारी यांनी बुधवारी विवाह केला. शनिवारी आलेल्या भूकंपामध्ये या दोघांचे सर्वकाही उध्वस्त झाले. तरीही दोघांनी ठरलेल्या मुहूर्तावर विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा विवाहच झाला नाही तर त्यांची वरातही काढली तसेच हनिमूनही साजरा झाला. भूकंपामध्ये सर्वकाही उध्वस्त झाल्यामुळे हे दोघे सध्या शिबिरात राहत आहेत. पण तरीही नवदाम्पत्य अत्यंत खूश असून, येणा-या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे ते म्हणाले.

29 ला विवाह 25 ला भूकंप
अमिता आणि नरेंद्र अनेक वर्षांपासून काठमांडूमध्ये राहतात. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी 29 एप्रिल ही तारीख ठरली. 25 एप्रिलला आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे दोघांचीही घरे उध्वस्त झाली. अमिता तिच्या घराच्या ढिगा-यात अडकली होती. नरेंद्रच्या मते त्याला क्षणभर असे वाटले की, सर्वकाही संपले. पण त्याने धीर सोडला नाही. नरेंद्र सर्वात आधी अमिताच्या घरी गेला आमि त्याने तिच्या कुटुंबीयांना ढिगा-यातून बाहेर काढले.

जख्मी अमिताबरोबर विवाह करण्याचा निर्णय
या भूकंपात अमिता मोठ्या प्रमाणावर जखमी झाली होती. सुरुवातीला ती आणि तिचे कुटुंबीय देखिल या विवाहासाठी तयार नव्हते. पण जेव्हा नरेंद्रने त्यांना समजावले तेव्हा ते तयार झाले. त्यानंतर दोघांनी ठरलेल्या तारखेला पशुपतीनाथाच्या मंदिरात विवाह केला. अमिताने सांगितले की, लग्नात व-हाडी म्हणून 36 लोक आले होते. १८ मोटरसायकलवर हे व-हाड आले. त्यात कुटुंबीयांचाही समावेश होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, नेपाळमधील ताज्या स्थितीचे PHOTO