आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंपाचे साइड इफेक्ट्स : नेपाळमधील धोकादायक ऐतिहासिक इमारती पाडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारहारा मनोर्‍यांचे छायाचित्रं. भूकंपात हा ऐतिहासिक मनोरा जमिनदोस्त झाला आहे. - Divya Marathi
धारहारा मनोर्‍यांचे छायाचित्रं. भूकंपात हा ऐतिहासिक मनोरा जमिनदोस्त झाला आहे.
(फोटो: काठमांडू येथील पूर्वीचे दरबार स्क्वेअर आणि भूकंपानंतर झालेली दुरवस्था.)

भक्तपूर (काठमांडू)- गेल्या 25 एप्रिलला विध्वसंकारी भूकंपात उद्‌ध्वस्त झालेल्या नेपाळ मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. हजारो लोक जखमी झाले असून लाखोंचा संसार उघड्यावर आला आहे. त्यासोबत नेपाळचा सांस्कृतिक वारसा समजला जाणार्‍या ऐतिहासिक वास्तु जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच उरलेल्या काही इमारतींनाही तडे गेले आहेत. त्यामुळे जनतेसाठी भविष्यात धोकादायक ठरु शकतात, असे मत नेपाळ सरकारने व्यक्त केले आहे. जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या पाडण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे.

नेपाळ दु:खातून लवकर सावरुन गतवैभव प्राप्त करेल, असा विश्वास नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी व्यक्त केला आहे. देशाच्या पुर्नबांधणीचा निर्धारही कोईराला यांनी व्यक्त केला आहे. ऐतिहासिक इमारती, मंदिरे, वारसा, सरकारी इमारती व गावे येणार्‍या पाच वर्षात पुन्हा वसविण्याचा आमचा संकल्प असल्याचे कोईराला यांनी म्हटले आहे.

नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे काठमांडू शहराचे अतोनात नुकसान झाले आहे. काठमांडूतील ऐतिहासिक वास्तूची मोठी पडझड झाली आहे. तसेच काही इमारती धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे या इमारती पाडण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे.

नेपाळ सरकारने काठमांडूसह संपूर्ण देशातील धोकादायक इमारतीचा सर्व्हेक्षण सुरु केले आहे. 12व्या शतकात उभारण्यात आलेले आणि यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज शहर म्हणून घोषित करण्‍यात आलेले भक्तपूर पूर्णपणे उद्‍ध्वस्त झाले आहे. अनेक ऐतिहासिक स्मारके जमिनदोस्त झाले आहेत. दुसरीकडे, नेपाळ लष्कराने भूकंपात उद्‍धवस्त झालेले 15व्या शतकातील दत्तात्रय मंदिर पाडण्याचे काम सुरु केले आहे.

नुकसानग्रस्त स्मारकांची डागडुजी करणार
विदेशी पर्यटकांना पुन्हा एकदा आकर्षित करण्यासाठी नेपाळ सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. भूकंपात पडझड झालेल्या स्मारकांच्या डागडुजीचे काम लवकरच सुरु करण्‍यात येणार आहे.
7.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळमधील 600 पेक्षा जास्त प्राचीन मंदिरे, पुतळे आणि म्युझियम्सचे मोठे नुकसान झाले आहे. 1832 साली काठमांडूमध्ये उभारण्यात आलेले 200 फूट उंच धारहारा मीनार जमिनदोस्त झाले आहे.
मदत निधीचा दुरुपयोग केल्यास कठोर कारवाई करणार...
भूकंप मदत निधीचा दुरुपयोग करताना आढळून येणार्‍या अधिकार्‍यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पंतप्रधान सुशील कोईराला यांनी दिला आहे. 'देशावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. देशाला पुन्हा उभे करण्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. या कामात कोणी भ्रष्टाचार करताना ‍दिसून आल्यास त्याची गय केली जाणार नसल्याचे कोईराला यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नेपाळमधील जमिनदोस्त झालेल्या ऐतिहासिक इमारतींचे फोटो...