आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रोष आणि हंबरडा, छायाचित्रातून पाहा विध्वंसकारी भूकंपानंतरचे नेपाळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: ढिगार्‍याखाली दबलेला व्यक्ती)
काठमांडू- नेपापळमध्ये शनिवारी आलेल्या विध्वंसकारी भूकंपाने हजारों लोकांचा बळी घेतला आहे. तसेच लाखों लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून तो 2500 वर पोहोचला आहे. या भूकंपामुळे नेपाळची जणू ओळखच नष्ट झाली, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नेपाळसाठी पुढील 72 तास धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे
नेपाळमधील अनेक पर्यटनस्थळे पूर्णपणे जमिनदोस्त झाली आहेत. ही पर्यटनस्थळे नेपाळच्या उत्पन्नाचा एक प्रमुख भाग होती. त्यामुळे भूकंपामुळे झालेल्या नुकसानीबरोबरच आगामी काळात उत्पन्नाचा मोठा प्रश्नही निर्माण झाला आहे. शेकडो इमारती जमिनदोस्त झाल्या असून हजारो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, नेपाळमधील विध्वंसकारी भूकंपानंतर उडालेल्या हाहाकारची छायाचित्रे...