आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 55 PHOTO तून पाहा उद्ध्वस्त झालेल्या नेपाळची परिस्थिती

VIDEO: नेपाळच्या भूकंपाची तीव्रता दाखवणारा व्हिडीओ झाला वायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळमधील भूकंपाची तिव्रता दाखवणारा VIDEO, स्विमिंगपूलचे पाणी समुद्रांच्या लाटांप्रमाणे उसळले
काठमांडू - विध्वंसकारी भूकंपामुळे प्रभावित झालेल्या नेपाळ आणि पूर्व भारतात पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, यामुळे मदत कार्यात मोठा अडथळा येऊ शकतो. हवामान विभागाने (नवी दिल्ली) कडून पुढील 48 तासात याप्रकारची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने सांगितले की, पुढील तीन दिवसांपर्यंत पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच बिहार आणि उत्तर भारतात पुढील दोन-तिन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जगप्रसिध्द पशुपतीनाथ मंदिराचेही झाले नुकसान
नेपाळमध्ये शनिवारी सकाळी आलेल्या दोन शक्तीशाली भूकंपानंतर संपूर्ण देश उद्ध्वस्त झाला आहे. अनेक इमारती पडल्या असून शरातील अनेक रस्त्यांना मोठे भगदाड पडले आहे. नेपाळमध्ये 81 वर्षांनंतर एवढ्या मोठ्या तिव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे काठमांडू येथील जगप्रसिध्द पशुपतीनाथ मंदिराला थोडे नुकसान झाले आहे. मंदिराच्या बाजूला असलेली एक इमारत भूकंपाच्या धक्क्यांमुळे जमिनदोस्त झाली आहे, यामुळे मंदिराच्या बाजूला राडारोडा जमा झाला आहे. तसेच नेपाळचे कुतुबमिनार म्हणून प्रसिध्द असलेला 'धारहारा मीनार' सुध्दा कोसळला आहे. या विध्वंसकारी भूकंपात हजारोंच्या संख्येने जीवीत हानी झाली आहे.

टेलिकॉम कंपन्यांनी कॉल दरांमध्ये केली कपात
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिकॉम लिमिटेडने या विध्वंसकारी भूकंप झालेल्या नेपाळसाठी त्यांचे कॉल दर कमी केले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसांसाठी त्यांच्या नेटवर्कवरून नेपाळसाठी करण्यात आलेल्या कॉलला लोकक चार्जेस लागतील. यापूर्वी भारतातून नेपाळला कॉल केला असता प्रतिमिनिट 10 रुपये एवढे पैसे मोजावे लागत होते. तसेच खासगी टेलिकॉम कंपनी एअरटेलनेसुध्दा पुढील 48 तासांकरीला नेपाळला करण्यात येणारे सर्वच कॉल मोफत केले आहेत.

इतिहासातला दूसरा शक्तीशाली भूकंप
हा भूकंप नेपाळच्या इतिहासातला दुसरा शक्तीशाली भूकंप मानला जात आहे. यापूर्वी 1934 मध्ये नेपाळ आणि उत्तर बिहारमध्ये 8.0 तिव्रतेचा भूकंप आला होता. यामध्ये 10,600 जानें गईं थी।

पुढील स्लाईडवर पाहा, आणि उद्ध्वस्त झालेल्या नेपाळचे फोटो, जे पाहून रडू कोसळेल..