आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळच्या या 25 फोटोंनी जगाला रडवले, पाषाणाच्या डोळ्यांतही तराळले अश्रू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळमध्ये 25 एप्रिलला झालेल्या 7.9 रिश्टर स्केल क्षमतेच्या विध्वंसकारी भूकंपाने नेपाळचे सर्वस्व हिरावून नेले आहे. निसर्गदत्त सौंदर्याने नटलेले नेपाळ आज भकास झाले असून हे राष्ट्र आता चोहोबाजूंनी संकटात सापडले आहे. आठवडा उलटून गेल्यानंतरही दुर्गम भागात मदत पोहोचू न शकल्याने भूकंपग्रस्तांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाषाणाच्या डोळ्यांतूनही अश्रू तराळावे, अशी स्थिती सध्या नेपाळमध्ये निर्माण झाली आहे. नेपाळमध्ये अन्न, पाणी, वीज आणि औषधांसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. भूकंपानंतर ढिगारे उपसण्याचे काम सुरु असले तरी आता कोणी जिवंत असेल, अशी आशाही मावळली आहे.
नेपाळने या प्रलककारी भूकंपात काठमांडू, भक्तपूर व ललितपूर येथे युनोचा जागतिक वारसा मिळालेली अनेक पर्यटन स्थळे गमावली आहेत. ही ठिकाणे आता पूर्वीच्या अवस्थेत आणता येणार नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले आहे.

नेपाळमध्ये झालेला भूकंप इतका शक्तीशाली होती की, त्यामुळे भूमंडळही डळमळले. वैज्ञानिकांच्या मते, काठमांडू हे शहर 30 सेकंदात 10 फूट दक्षिणेकडे सरकले आहे. सोबतच पृथ्वीच्या एका मोठ्या भूभागात देखील बदल झाले आहेत. वाडिया भूविज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांनी नासाच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या भूकंपामुळे भूगर्भात 10 किमी आत निर्माण झालेली ऊर्जा 1,689 अण्वस्त्र बॉम्बच्या एवढी आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, जगाला रडवणारी नेपाळमधील 25 हृदयद्रावक फोटो...