आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nepal earthquake News Role Of Sherpas In Himalaya

यांच्या जीवनात दररोज येतात भूकंप, जगातील सर्वात कठीण काम करतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी (ता.25) नेपाळमध्‍ये आलेल्या भूकंपाचे धक्के भारतातही जाणवले. दुसरीकडे रव‍िवारी(ता.26) जगाचे छत म्हणून संबोधले जाणा-या माऊंट एव्हरेस्टमध्‍येही हिम-स्खलन झाले.यात अधिक संख्‍येने असलेले गिर्यारोहक आणि गाईड म्हणून काम करणारे शेरपा यांचे जीव वाचले. परंतु प्रत्येक वेळी असे होत नाही. माऊंट एव्हरेस्टवर चढणे शेरपांशिवाय शक्य नाही.कारण त्यांना प्रत्येक ठिकाणांची माहिती असते. गिर्यारोहक हे कितीही आधुनिक साधनांनी सज्ज असले, तरी खरी मदत त्यांना शेरपाच करत असतात. ते जगातील सर्वात कठीण असे काम करतात असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. कारण त्यांच्या आयुष्‍यात दररोजच भूकंप येत असतात.

मागील वेळेस माऊंट एव्हरेस्टमध्‍ये आलेल्या वादळाने 16 शेरपांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही त्यांची हिंमत कमी झालेली नाही. divyamarathi.com तुम्हाला येथे सांगणार आहोत, की शेरपा कोण आहेत, ते कुठून येतात आणि माऊंट एव्हरेस्टवर चढाई कशी करतात या बाबत सांगणार आहोत.
कोण असतात शेरपा ?
शेरपा, हिमालयाच्या बर्फाळ भागात राहणारी एक जमात आहे. ते प्रामुख्‍याने नेपाळमधील हिमालयाच्या भागात राहतात. तसेच शेरपा भारत आणि तिबेटमध्‍येही राहतात. शेरपा तिबेटी भाषेतील शब्द 'शर' आणि 'पा' प्रत्यय मिळून बनले आहे. याचा अर्थ होतो पूर्वेकडील लोक.
कुठून आले ?
प्राध्‍यापक जेम्स फ‍िशर यांच्या अभ्‍यासानुसार, 'शेरपा'ज : रिफ्लेक्शन ऑन चेंज इन हिमालयन नेपाळ या निबंधात 1600 मध्‍ये पूर्व तिबेट खाम भागात शेरपा तांडे स्थलांतर करुन नेपाळमध्‍ये आले होते. त्यांच्या स्थलांतरामागे दुष्‍काळ आणि युध्‍द हे होते. शेरपा पूर्व हिमालयात(आता नेपाळ) येऊन स्थायिक झाले आणि हळुहळू बौध्‍द संस्कृती स्वीकारली.
पुढील स्लाइड्स वाचा, जीव धोक्यात टाकून किती शुल्क आकारतात शेरपा?