आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेस्क्यू ऑपरेशन\'मध्ये एक लाख सैनिक, नेपाळमध्ये आता इंधन संकट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मित्राच्या मृतदेहाखाली 24 तास दबला होता. - Divya Marathi
मित्राच्या मृतदेहाखाली 24 तास दबला होता.
नव दिल्ली/काठमांडू- नेपाळ सरकार बचाव कार्यात आर्मी सैनिकांना उतरवले आहे. सुमारे एक लाख सैनिकांना बचाव कार्यासाठी पाठवण्यात आलेल्याची माहिती नेपाळ आर्मीचे प्रवक्ता जगदीश पोखरेल यांनी दिली. दुसरीकडे, भारतातसंसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नेपाळ भूकंपातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सर्वांनीच नेपाळ भूकंपग्रस्तांच्या बचावकार्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. तसेच अफवांना बळी न पडण्‍याचे आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे सरकारने देशातील जनतेला आवाहन केले आहे. आपत्तीच्या काळात संपूर्ण भारत देश नेपाळच्या पाठीशी असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
बिहारमध्ये दोन दिवस सिनेमागृहे बंद...
दुसरीकडे, दोन दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असल्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील दरभंगाचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व सिनेमागृहे बंद ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, नेपाळसह भारतात मागील दोन दिवसांत 66 पेक्षा जास्त धक्के बसले. त्यापैकी दोन धक्के तीव्र होते. रिश्टर स्केलवर 6.7, 6.5 तीव्रतेचे होते. त्यांचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. या भूंकपाने आतापर्यंत 3118 नागरिकांचा बळी घेतला असून 6500 जखमी झाल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने दिली आहे. परंतु, मृतांचा आकडा 10 हजारांच्या घरात जाण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

रुग्णालये जखमींनी खच्चून भरले आहेत. रक्ताच्या तुडवड्यामुळे जखमींवर उपचार करताना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. यासाठी नेपाळ सरकारने संपूर्ण जगाला रक्तदान करण्‍याचे आवाहन केले आहे.

दुसरीकडे, रविवारी रात्री पाऊस झाला आणि पुढील 48 तास पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. दरडी कोसळण्याची शक्यता आहे.

स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधील दुर्गम डोंगराळ भागात अजून सहा हजार लोक अडकले आहेत. त्यांच्यापर्यंत अजून बचाव पथक पोहोचले नसल्याची माहिती समोर आली आहे.


महत्त्वाचे अफडेट

- नेपाळमध्ये पेट्रोल - डिझेलचे संकट. स्पाइस जेटने नेपाळमध्ये अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी दोन अतिरिक्त स्पेशल उड्डाणे जाहीर केली. त्याशिवाय पुढच्या दोन दिवसांसाठी बेस फेयर घटवून एक रुपया केले.
- तेलुगु चित्रपटांचा अभिनेता के. विजय याचा भूकंपामुले मृत्यू. शनिवारी भूकंप आला त्यावेळी 25 वर्षीय विजय एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी नेपाळमध्ये होता. शनिवारी त्याची कार पलटी झाली त्यात त्याचा मृत्यू झाला.
- #OperationMaitri चे इंचार्ज जनरल संधू म्हणाले, नेपाल मध्ये @PMOIndia च्या अंतर्गत सुरू असलेले बचाव कार्य चीन आणि इतर इतर देशांच्या ऑपरेशन्सच्या तुलनेत दहा पटीने मोठे.
- संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नेपाळ आणि भारतातील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व खासदारांचे एका महिन्याचे वेतन दान करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर सर्व पक्ष एकमत असल्याचेही ते म्हणाले.
- नेपाळमध्ये मदत कार्य करणारे भारतीय जवान, एनडीआरएफचे जवान आणि डॉक्टरांचे आभार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- आपत्तीच्या काळात संपूर्ण भारत देश नेपाळच्या पाठीशी - कॉंग्रेस
- सर्वांनीच नेपाळ भूकंपग्रस्तांच्या बचावकार्यासाठी योगदान द्यावे- केंद्र सरकार

- देशातील नागरीकांनी अफवांना बळी पडू नये. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. आपत्तीत सगळ्यांनी सहकार्य करा- सरकार

-लोकसभेत नेपाळच्या भूकंपावर चर्चा सुरु, केंद्र सरकराने सादर केले निवेदन
- नॅशनल क्रायसिस मॅनेजमेंट कमेटीच्या (एनसीएमसी) बैठकी पूर्वी गृहमंत्री राजनाथ सिंहांचे स्पष्टीकरण भूकंप प्रभावित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्रींकडून घेतल्या आढावा. नेपाळला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन

- लोकसभेत नेपाळ भूकंपातील मृतांना श्रद्धांजली. संसदेत 12 वाजता केंद्र सरकार निवेदन देणार

- नेपाळमधील पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विमागाचे संचालक जनरल एल.एस. राठोड यांनी सांगितले. या पावसामुळे मदत कार्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- हैदराबाद येथील एका गर्यारोहक माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पमधून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.

- नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत मायदेशी आणण्यासाठी पोखरा ते ब‍िहार, काठमांडू ते उत्तर प्रदेशातील गोरखपूरपर्यंत विशेष बस सुरु करण्‍यात येणार असल्याची माहिती परराष्‍ट्र मंत्रालयाने दिली आहे.

- काठमांडूतील न्यू बस पार्क भागात तीन दिवसांपासून ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. एका जिवंत व्यक्ती‍ला बाहेर काढण्‍यासाठी बचाव पथकातील जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत.
- भूकंपात 3218 नागरीकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनीच्या हवाल्याने मिळाली आहे. मृतांचा आकडा 10 हजारांवर जाण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

- रक्ताचा तुडवडा, जखमींसाठी रक्तदान करण्‍याचे नेपाळमध्ये सरकारने केले आवाहन

- मदत कार्यासाठी गृह मंत्रालयाचे एडिशनल सेक्रेटरी बी.के.प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखाली एक इंटर-मिनिस्ट्रियल टीम नेपाळला रवाना.

- @MEAIndiaच्या 'ट्वीट'नुसार भारतीय हवाई दलाचे विमानांनी 1935 लोकांना सुखरुप भारतात आणले.

हेल्पलाइन नंबर
'नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी'- 011-26701728, 011-26701729, 09868891801
काठमांडू येथील भारतीय दुतावास- +9779851107021, +9779851135141
पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा, भूकंपानंतरचे नेपाळ...