आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • EXCLUSIVE: भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या गोरखा गावात दबलेत 1000 मृतदेह, अजून मदत पोहोचली नाही

EXCLUSIVE: \'गोरखा\' उद्‍ध्वस्त, मृतदेहांचा खच, पीडित मदतीच्या प्रतिक्षेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नेपाळच्या असलांग गावाचे भूकंपानंतरचे हृदयद्रावक चित्र, येथे पाच लोकांचा मृत्यू झाला.)

काठमांडू/गोरखा - नेपाळमध्ये शनिवारी झालेल्या भूकंपानंतर 66 लहान-मोठे धक्के बसले. भूकंपामध्ये मरणाऱ्यांची संख्या अधिकृतपणे 3200 च्यावर सांगण्यात येत आहे. मात्र यामध्ये गोरखा येथील मरणाऱ्यांची संख्या पकडण्यात आलेली नाही. भूकंपाने काठमांडूनंतर गोरखामध्येच सर्वात जास्त विध्वंस केला आहे.

या भागात 1000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेहांचा सर्वत्र खच पडला असून अक्षरश: ते सडत आहेत. तर एक हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. तर दोन हजारांपेक्षा जास्त लोक येथे अजूनही अडकलेले आहेत, मात्र येथे अजूनपर्यंत कोणतीच मदत पोहोचलेली नाही. काठमांडूमध्ये असलेला आमचा वार्ताहर राजेश कुमार ओझा यांनी गोरखाची सविस्तर माहिती दिली आहे.

गोरखाचे डीएसपी अर्जुन चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभावित क्षेत्रांमध्ये पोहचण्याकरिता अजून तीन दिवस लागू शकतात. रस्त्यावर दरड कोसळल्याने ते बंद झाले आहेत. दुर्गम भाग असल्याकारणाने तेथे हेलिकॉप्टरही उतरू शकत नाही. या भागात जवळपास 90 टक्के घरे जमीनदोस्त झाली आहेत. यामध्ये घरे पडल्यामुळेच जास्त मृत्यू झाले आहेत.

मदत पोहोचवणे होत आहे अशक्य
रविवारी भारतीय वायू सेनेचे विमान या भूकंपबाधीत क्षेत्रात गेले होते, मात्र ते तिथे उतरू शकले नाही. सोमवारी यापेक्षा छोटे विमान पाठवून मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वीज आणि मोबाईल कनेक्शन बंद पडल्याने भूकंपातून वाचलेल्या लोकांच्या अडचणी अजून वाढल्या आहेत.

रविवारी सकाळी नेपाळ सरकारचे बचाव पथक आले होते, मात्र ते आपत्तीग्रस्त लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही. येथे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यात मोठमोठे दगड पडल्याने तो बंद झाला आहे. त्यामुळे त्या भागाशी पूर्णपणे संपर्क तुटला आहे.

शॉपिंगसाठी गेले होते लोक
शनिवारी शॉपिंगसाठी डोंगरावरून खाली आलेले लोकसुध्दा येथे अडकले आहेत. स्थानिक लोकांच्यामते शनिवारी सकाळी गावातील अनेक लोक गोरखा बाजारात सामान विकत घेण्यासाठी खाली उतरले होते. सामान घेऊन ते जेव्हा वरती येत होते तेव्हाच भूकंप आला.
पुढील स्लाईडवर पाहा, गोरखा आणि इतर भागातील भूकंपानंतरचे हृदयद्रावक फोटो...