आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंप: नेपाळच्या राष्‍ट्रपतींनी तंबूत घालवली रात्र, पंतप्रधानांच्या निवासाला धक्के

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - देशाचे राष्‍ट्रपती राम बरन यादव यांना शनिवारी(ता.25) रात्रभर तंबूत रहावे लागले यावरुन नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीचा एक अंदाज येऊ शकतो. भूकंपामुळे त्यांच्या शासकीय निवासस्थानाला भेगा पडल्या होत्या. राष्‍ट्रपती भवनाचे अधिका-यांनी सांगितले, की राष्‍ट्रपती व्यतिरिक्त त्यांचे सुरक्षा रक्षकही तंबूत राहिले. पुन्हा भूकंप आल्यास 150 वर्षे जुने राष्‍ट्रपती भवन पडू शकते. एका वृत्तानुसार नेपाळचे पंतप्रधान सुशील कोइराला यांच्या निवासस्थानाचा प्रवेश द्वाराला नुकसान पोहोचले आहे. मात्र यावेळी पंतप्रधान देशाच्या बाहेर होते. नेपाळच्या अनेक इमारतींना नुकसान पोहोचले आहे.

मदतीसाठी पोहोचले रामदेव
योगगुरु बाबा रामदेव सध्या काठमांडू येथे आहेत. रव‍िवारी(ता.26) त्यांनी सांगितले, की नेपाळच्या 75 जिल्ह्यात व 14 प्रशासकीय क्षेत्रात त्यांच्या संस्थेचे 30 हजार स्वयंसेवक आहेत. ते जखमी लोकांना रक्तदानापासून खाण्‍याचे साहित्य पुरवण्‍याचे काम करित आहे, बाबा रामदेव यांनी सांगितले.शनिवारच्या भूकंपा दरम्यान बाबा मरता-मरता वाचले.

मृतांचा आकडा जाऊ शकतो दहा हजारांपर्यंत
नेपाळचे माजी मंत्री बाबूराम भट्टाराईने मृतांचा आकडा 10 हजारापर्यंत जाऊ शकतो याची शंका व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले, 80 वर्षात ही सर्वात मोठा भूकंप नेपाळमध्‍ये आला आहे. यात जीव‍ित-वित्त नुकसान खूप झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, भूकंपानंतर नेपाळमधील भयावह स्थिती..