आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंपामुळे नेपाळच्या जिवंत देवीला प्रथमच चालावे लागले पायी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धन कुमारी वज्राचार्य, 1954 मध्ये गादीवर बसल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय अवघे दोन वर्ष होते. - Divya Marathi
धन कुमारी वज्राचार्य, 1954 मध्ये गादीवर बसल्या होत्या. त्यावेळी त्यांचे वय अवघे दोन वर्ष होते.
काठमांडू - एप्रिल 2015 मध्ये नेपाळमध्ये जेव्हा भूकंप आला, त्यावेळी नेपाळची ‘कुमारी’ म्हणजेच ‘जिवंत देवी’ला जे करावे लागले त्याचा कोणी विचारही केला नसेल. या देवीली आजवरच्या जीवनात प्रथमच पायी चालावे लागले. 63 वर्षीय देवीने एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली.

दोन वर्षांच्या वयापासून एकाकी जीवन जगणाऱ्या धन कुमारी वज्राचार्य यांनी त्या आसनावर बसल्यानंतर सुमारे 30 वर्ष एवढ्या दीर्घ काळानंतर मोकळेपणाने चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1980 च्या दशकात त्यांना गादीवरून हटवण्याच्या कटू आठवणी आजही ताज्या असल्याचे त्या म्हणाल्या. 25 एप्रिल 2015 ला आलेल्या 7.8 एवढ्या तीव्रतेच्या भुकंपापूर्वी वज्राचार्य या केवळ एकदाच वेळी सजलेल्या पालखीत लोकांसमोर आल्या होत्या. नेपाळमध्ये ‘जिवंत देवी’ला ‘कुमारी’ नावाने ओळखले जाते. हिंदू आणि बौद्ध धर्मातील मान्यतेनुसार या देवीला एकाकी जीवन जगावे लागते. त्यामुळे शक्यतो त्या कोणाशीही बोलत नसतात.

भूकंपानंतर वज्राचार्य यांनी नाइलाजाने काठमांडूच्या दक्षिणेत असलेल्या पाटन शहरात घराबाहेर पडावे लागले. तीन दशकांत देवी पायी चालत घराबाहेर येण्याची ही पहिलीच वेळ होती. मला अशाप्रकारे घराबाहेर पडावे लागेल असे मला वाटले नव्हते, असे त्या म्हणाल्या. हजारो प्राण घेणाऱ्या या नैसर्गित आपत्तीच्या या धक्क्यातून त्या अजूनही सावरलेल्या नाहीत. 63 वर्षीय वज्राचार्य म्हणाल्या की, लोक आता परंपरांचा सन्मान करत नाही, त्यामुळे कदाचित देव रागावले असतील. या संकटात देवीचे पाचमजली घरही हादरले होते. पण देवी त्याचठिकाणी राहणार की परंपरा तोडून बाहेर जाणार याची वाट त्यांच्या नातेवाईकांनी पाहिली.

त्यांची पुतणी चानिरा हिने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कोणालाही काय करावे हे कळत नव्हते. पण इतरांप्रमाणे त्या घर सोडूनही जाऊ शकत नव्हत्या. पण निसर्ग दबाव आणतो तेव्हा आपल्याला कल्पनेच्या पलिकडे असे काहीतरी करावे लागते. धन कुमारीला 1954 मध्ये गादीवर बसवण्यात आले होते. सुमारे तीन दशकांपर्यंत त्या पाटनच्या कुमारी होत्या. नेपाळमध्ये कुमारीची निवड करण्यासाठीचे कायदे अत्यंत कडक आहेत. शारिरीक वैशिष्ट्यांबरोबरच अनेक पातळ्यांवर सिद्ध केल्यानंतरच कुमारी बनता येते.

पुढील स्लाइड्सवर पाहा. धन कुमारी वज्राचार्य यांचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...