आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक अडकल्याने अघोषित नेपाळात "पेट्रो इमर्जन्सी', नेपाळ सरकारचे वाहने चालवण्यावर अंकुश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू- भारतीय सीमेवर अनेक ट्रक अडकल्याने नेपाळमध्ये इंधनसंकट निर्माण झाले आहे. यामुळे येथे अघोषित पेट्रो इमर्जन्सी लागू करण्यात आली. नेपाळ सरकारने वाहने चालवण्यावर अंकुश लावला आहे. एक दिवस सम क्रमांकाच्या आणि एक दिवस विषम क्रमांकाची वाहने रस्त्यावर काढावी, असे आदेश सरकारने दिले आहेत.
विमान कंपन्यांनी इतर देशांमधून पेट्रोल भरावे, असा सल्लाही दिला आहे. विमानांना नेपाळमध्ये पेट्रोल मिळू शकणार नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. भारत-नेपाळच्या सीमेवरील वीरगंज या चेकपोस्टवर सुमारे एक हजार ट्रक अडकले आहेत. नेपाळच्या घटनेचा विरोध करणारे मधेसी आंदोलकांनी हे ट्रक रोखले आहेत. भारतीय कस्टम अधिकाऱ्यांनीही हे ट्रक नेपाळमध्ये जाण्यास रोखले आहेत. आंदोलनामुळे कोणतीही आपत्ती कोसळू नये यासाठी ट्रकचालकही नेपाळमध्ये जाण्यास उत्सुक नाहीत. यामुळे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून नेपाळ ऑइल कॉर्पोरेशनला होणारा पेट्रोल पुरवठा बंद करण्यात आला.

पॅरिसमध्ये एक दिवस वाहने बंद
पॅरिस-वेगाने वाढणारे प्रदूषण लक्षात घेऊन फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एक दिवस वाहन बंदचे आदेश सरकारने दिले आहेत. पॅरिसचे महापौर आना एन हिदालगो यांनी रविवारी ‘डे विदाऊट कार्स’ची घोषणा केली. दोन महिन्यांनी पॅरिस येथे हवामान बदलावरील शिखर परिषद होणार आहे.

प्रसिद्ध चँप्स-एलिसीज एव्हेन्यू येथे रविवारी साओ पावलो, ब्रुसेल्स, ब्रिस्टल्स आणि पॅरिसच्या महापौरांची बैठक झाली. फ्रान्समध्ये केवळ कार्स नव्हे, तर मोटारसायकलीही या कालावधीत रस्त्यांवर आणण्यास बंदी घातली आहे. बंदीच्या कालावधीत कमाल २० किलोमीटर प्रतितास या वेगाने कार्स चालू शकतील. पोलिसांची यावर करडी नजर असते. या बंदमधून बस, पोलिसांची वाहने, अग्निशमन दलाच्या वाहनांना सूट देण्यात आली.