आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेेपाळमध्ये भीषण भूकंपांचा धोका कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडूमधून - नेपाळमध्ये २५ एप्रिलला जेव्हा जमिनीवर लोकांची हालचाल सुरू होती तेव्हा भूगर्भामध्ये मोठ्या हालचाली सुरू होत्या. चार-पाच कोटी वर्षंापूर्वी जमिनीचे दोन भीमकाय खंड- भारत व युरेशिया यांच्या भूगर्भांतर्गत हालचालींमुळे हिमालय पर्वताची निर्मिती झाली होती. त्याच्या खाली जेथे आता नेपाळ आहे. तेथे एक भूगर्भीय जखम झाली, ज्यात मंद गतीने भारतीय प्लेट आणि युरेशिया प्लेटदरम्यान टक्कर सुरू असते. त्या हालचालीतून ऊर्जा उत्पन्न होते. जेव्हा दोन्ही प्लेट जास्त सरकतात तेव्हा भूकंप होतो.
नेपाळला कधीही भीषण भूकंप होऊ शकतो, अशा सूचना तज्ज्ञ अनेक वर्षांपासून देत हाेते. हा भूकंप १९३४ मधील भूकंपासारखा असू शकतो. तेव्हा नेपाळ, बिहारमध्ये दहा हजारांपेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. त्याची तीव्रता ८.१ रिश्टर स्केल होती. अमेरिकेचे भूकंप तज्ज्ञ सूसन हग म्हणतात, जेव्हा नेपाळमध्ये ७.८ तीव्रतेचा भूकंप झाला, ती आश्चर्याची गोष्ट नव्हती तर या भूकंपाची आम्ही वाट पाहत होतो.
या भूकंपाने हजारो लोकांचा बळी
घेतला आहे. हग म्हणतात, लोक अनेक वर्षांपासून या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची तयारी करीत आहेत. मात्र, त्यांच्याजवळ संसाधने नाहीत. काठमांडूच्या घाटीत २५ लाख लोक राहतात. यात जवळपास चार टक्के दरवर्षी वाढ होते. १९९४ मध्ये भूकंप सहन करणारी घरे बांधण्यासाठी नियम लागू केले. पण त्याचे पालन
झाले नाही.
नक्षल्यांकडून दहा वर्षांपर्यंत सुरू असलेल्या जीवघेण्या संघर्षात १३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी जीव गमवला. २००६ मध्ये बंड शांत झाल्यानंतर राजेशाहीचा अंत झाला. काठमांडूतील अध्ययन केंद्राचे अध्यक्ष निश्चल पांडे म्हणतात की, अाता राजकीय स्थिरता नाही. दुर्घटनेनंतर बचाव कार्यात त्रुटी दिसल्या. येथील ट्राॅमा सेंटरच्या सहा ऑपरेटिंग खोल्यांपैकी एकच काम करत आहे. अॅनेस्थेशिया व दुसऱ्या औषधांचा साठा संपला. भूकंपानंतर भारतीय बचाव दलाने जोरात कार्य केले. समन्वयक जेमा मेकगोल्डरिक म्हणाले की, दोन महिन्यांनंतर मान्सूनमुळे परिस्थिती
गंभीर होईल.