आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nepal Sees Deadly Clashes Before Constitution Adopted

नेपाळ: नवीन संविधान लागू;देशात अशांतता, पोलिसांचा गोळीबार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: काठमांडूमध्‍ये पोलिस एका निदर्शन करणा-या नागरिकाला घेऊन जाताना.
काठमांडू - नेपाळमध्‍ये रविवारपासून (ता.20) नवीन संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. मात्र याविरुध्‍द विरोध सुरु झाल्याने देशातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्‍यात आली आहे. राजधानी काममांडूमध्‍येही सुरक्षितता वाढवली आहे. या दरम्यान दक्षिण नेपाळमधील बीरगंज शहरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा जीव गेला आहे.
स्थानिक माध्‍यमांच्या वृत्तांनुसार देशातील दक्षिण भागात निदर्शन करणा-यांवर पोलिसांनी गोळीबार केला आहे. नेपाळच्या नवीन संविधानाला बुधवारी संमती मिळाली होती. रविवारी(ता. 20) संसद भवन परिसरात आयोजित एका खास कार्यक्रमात राष्‍ट्रपती रामबरन यादव यांनी देशात नवीन संविधान लागू होत असल्याची घोषणा केली. या संविधानानुसार हिंदु बहुसंख्‍यांक असलेला नेपाळ आता धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जाईल.