आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MC पीरियड सुरु झाल्यानंतर अशी होऊन जाते Life, काय सांगतात नेपाळी तरुणी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- मासिक पाळीच्या काळात तरुणी-महिलांना गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागतो. मासिक पाळी आल्यानंतर तरुणी- महिलांना नेपाळमध्ये गायीच्या गोठ्या ठेवले जाते. तब्बल पाच दिवस मुली अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगतात. ही एक प्राचीन परंपरा असून तिला 'छौपदी' असे संबोधले जाते. पश्चिम नेपाळसह भारत व बांगलादेशातील काही भागात आजही ही परंपरा कायम आहे.

मासिक पाळीच्या काळात महिलांना घरात प्रवेश दिला जात नाही. नेपाळमधील काही तरुणींनी महिलांचे काही फोटोज शेअर केले आहेत. त्यातून महिलांचे जीवन दर्शवण्यात आले आहे.

महिलांना का ठेवले जाते गायीच्या गोठ्यात...?
- 'छौपदी'चा अर्थ म्हणजे अस्पृश्य. अनेक शतकांपासून नेपाळमध्ये ही परंपरा चालत आली आहे.
- मासिक पाळी तसेच प्रसुतीनंतर महिलांना अपवित्र मानले जाते. याकाळात महिलांवर अनेक प्रतिबंध लादले जातात.
- मासिक पाळीच्या काळात महिलांना घरात प्रवेश दिला जात नाही. त्यांना कोणाला स्पर्श करण्यास बंदी घातली जाते. मुलांना जवळ घेत नाही. त्या स्वयंपाक करू शकत नाही. शाळा, मंदिरात जाऊ शकत नाही.
- त्यांना दररोजच्या जेवणात केवळ पाव किंवा भात दिला जातो.
- ऑगस्ट महिन्यात येणार्‍या ऋषि पंचमीला अशा महिला-मुलींना अंघोळ घातली जाते. त्यांनी केलेल्या पापबद्दल क्षमा मागवी लागते.
- 'छौपदी' प्रथेला नेपाळमधील सुप्रीम कोर्टाने 2005 मध्ये कायदेशीर मान्यता दिली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, प्रथेचे पालन न केल्यास मिळते शिक्षा

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...