आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीत पंतप्रधानांना भेटले नेताजींचे पणतू, मोदी म्हणाले- सत्य लवकरच बाहेर येईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू सूर्या बोस यांनी जर्मनी दौर्‍यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बर्लिनमध्ये भेट घेतली. सोमवारी झालेल्या या भेटीत सूर्या बोस यांनी सुभाषचंद्र बोस हेरगिरी प्रकरण आणि त्यांच्या मृत्यूसंदर्भातील गोपनिय फाईल सार्वजनिक करण्याची मागणी केली. सत्य ते लवकरच सार्वजनिक केले जाईल, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले.
पंतप्रधान मोदी यांच्यासाठी जर्मनीतील भारतीय राजदूत विजय गोखलेद्वारा रिसेप्शन देण्यात आले. या कार्यक्रमात सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंबीयांनी मोदींची भेट घेतली.
दरम्यान, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कार्यकाळात सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांवर 20 वर्षे पाळत ठेवण्याचा गौप्यस्फोट गुप्तहेर खात्याच्या दस्तऐवजांमुळे झाला आहे. यानंतर बोस यांच्या कुटुंबीयांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. पंतप्रधान मोदींपर्यंत आता हे प्रकरण पोहोचले आहे. त्यामुळे ते या प्रकरणातील सत्य सार्वजनिक करतील, असा विश्वास देखील सूर्या बोस यांनी व्यक्त केलाआहे.
दुसरीकडे, जवाहरलाल नेहरू यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांची हेरगिरी केल्याच्या वृत्ताने देशभरातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गुप्तचर खात्याच्या दस्तऐवजांमधील तपशील उघड झाला असला तरी कॉंग्रेसने या संबंधीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नेताजींमुळे जवाहरलाल नेहरू येणार होते अडचणीत- सूर्या बोस