आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेकडो नेत्यांचा पाहुणचार केला, पण मोदी-ट्रम्प यांचा इस्रायल दौरा ऐतिहासिक - नेतन्याहू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - इस्रायलचे पीएम बेंजामिन नेतन्याहू यांनी पीएम नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाचे तोंडभर कौतुक केले आहे. आतापर्यंत आपण शेकडो नेत्यांचा पाहुणचार केला, पण मोदी आणि ट्रम्प यांचा इस्रायल दौरा ऐतिहासिकच होता, असे नेतन्याहू म्हणाले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाला (UN) संबोधित करताना नेतन्याहू बोलत होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, पीएम मोदी 4 जुलै रोजी 3 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर गेले होते. 

आणखी काय म्हणाले नेतन्याहू
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार नेतन्याहू म्हणाले, "मोदींनी इस्रायलला येऊन केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवाच्या भविष्याची उमेद पाहिली आहे."
- "मी मागच्या वर्षी देखील यूएनमध्ये स्पीच देण्यासाठी आलो होतो. त्यावेळी मी इस्रायलचा जगाविषयी बदललेला दृष्टीकोण मांडला होता. आतापर्यंत मी शेकडो पीएम आणि राष्ट्राध्यक्षांचा पाहुणचार केला आहे. त्यापैकी कित्येक नेते प्रथमच इस्रायलला आले होते."
- "या नेत्यांपैकी दोन नेत्यांचा दौरा ऐतिहासिक ठरला. मे महिन्यात ट्रम्प यांनी केलेला इस्रायल दौरा... ते प्रथमच इस्रायल दौऱ्यावर आले होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वेस्टर्न वॉलला आणि ज्यू समुदायाच्या टेम्पल माउंटला भेट दिली. जेव्हा त्यांनी तेथील धार्मिक प्रतिकांना स्पर्श केला, तेव्हाच त्यांनी इस्रायलींचे मन देखील स्पर्श केले."
 
इस्रायलला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान मोदी
- नेतन्याहू पुढे म्हणाले, "जुलै महिन्यात मोदी इस्रायल दौऱ्यावर आले. ते इस्रायल दौरा करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत."
- "आपणही मोदींसोबत माझी छायाचित्रे पाहू शकता. आम्ही पेडोरा बीचवर सोबतच होतो. आम्ही एकत्रितरीत्या जीप चालवली. जीपमध्ये वॉटर प्युरिफायर लावला होता. जे इस्रायली कंपनीने बसवले होते. आम्ही शूज काढले आणि भूमध्यसागरात गेलो. यानंतर स्वच्छ झालेले समुद्राचे पाणी देखील पिले."
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदी आणि नेतन्याहू यांच्या भेटीचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...