आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Audio Tape Revels That Laden Gave Gandhiji\'s Example To His Supporters

ऑडिओ टेप : लादेनवरही होता गांधीजींचा प्रभाव! देत होता असहकाराचे धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - ओसामा बिन लादेन - Divya Marathi
फाईल फोटो - ओसामा बिन लादेन
लंडन - अल कायदाचा दिवंगत म्होरक्या ओसामा बिन लादेनवर एकेकाळी महात्मा गांधींच्या आंदोलनाचा प्रभाव होता. लादेनने 1993 मध्ये रेकॉर्ड केलेला एक ऑडिओ टेप नुकताच समोर आला आहे. या टेपमध्ये ओसामा त्याच्या सहकाऱ्यांना महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात उचललेल्या पावलांचा अवलंब करण्याचा सल्ला देत असल्याच्या आशयाचे भाषण आहे. ओसामा त्याच्या सहकाऱ्यांना गांधीजींच्या असहकार आंदोलनाचे उदाहरण देत, अमेरिकेत तयार करण्यात आलेल्या वस्तू वापरायला नको, असे सांगत असल्याचे या टेपमध्ये आहे.

कॅसेटमध्ये मिळाला संदेश
2001 मध्ये अफगानिस्तानात सुरू करण्यात आलेल्या लष्करी कारवाईदरम्यान ओसामाचा कंधहार शहर सोडण्याचा नाइलाज झाला होता. 1997 पासून तो त्याठिकाणी तळ ठोकून होता. येथे एका इमारतीमधून सुमारे 1500 ऑडिओ आणि व्हिडिओ कॅसेट्स मिळाल्या होत्या. एका परदेशी वाहिनीच्या वृत्तानुसार या कॅसेट्स मॅसाच्युएट्समध्ये विलियम्स कॉलेजच्या अफगान मिडिया प्रोजेक्टकडे गेल्या होत्या. त्यांनी कॅलिफोर्निया यूनिव्हर्सिटीमध्ये अरबी भाषेचे तज्ज्ञ फ्लॅग मिलर यांच्याकडून याबाबत माहिती मागवली होती.

200 जणांचे ऑडियो रेकॉर्डिंग
हे टेप 1960 पासून 2001 पर्यंतचे आहेत. त्यात 200 जणांची भाषणे आहेत. त्यापैकी बहुतांश अल कायदा आणि तालिबानशी संलग्न नेते आहेत. एका टेपमध्ये महात्मा गांधींचाही उल्लेख आहे. ओसामाने सप्टेंबर 1993 मध्ये या टेपमध्ये महात्मा गांधांकडून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला होता. टेपमधील भाषणात ओसामाने त्याच्या सपोर्टर्सना अमेरिकेत तयार करण्यात आलेल्या वस्तू न वापरण्याचे आवाहनही केले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणाला होता लादेन...