आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्ट्रीमिंगचे नवे तंत्र यशस्वी ठरल्याने केबल कंपन्यांसमोर नवी आव्हाने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दशकभरापासून केबल कंपन्या लाखो ग्राहकांना शेकडो वाहिन्यांचे प्रलोभन दाखवून आकर्षित करत आहेत. मात्र, त्यांच्या प्रसारणाची स्थिती यथातथा असून लोक टीव्हीपेक्षा अधिक येणाऱ्या खर्चाकडे लक्ष देतात. अनेक ग्राहक दर महिन्यात आपले कनेक्शन काढून टाकण्याचा विचार करतात. अनेकदा एखाद्या खास वाहिनीचे किंवा शोचे आकर्षण असल्याने पुन्हा ते हा निर्णय मागे घेतात. गेल्या ३ महिन्यांत ५ लाख २७ हजार ग्राहकांनी आपले केबल बंद केले आहे. यापूर्वीच्या तिमाहीत ग्राहकांच्या संख्येत ७ लाख ५० हजारांनी घट झाली होती. केबल उद्योगासाठी अशी परिस्थिती पूर्वी कधी उद््भवली नव्हती. सध्या शिल्लक ग्राहकांपैकी अनेकांना नव्या पर्यायांविषयी साशंकता आहे. त्यामुळे ठोस पर्यायाच्या प्रतीक्षेत ते आहेत.  

तंत्रज्ञान कंपन्या आता यात बदल करत आहेत. गेल्या वर्षभरात व्हिडिआे स्ट्रीमिंग सेवांची लोकप्रियता वाढली आहे. गेल्या १२ महिन्यांत अॅमेझॉन प्राइमच्या ग्राहकांची संख्या दुपटीपेक्षा अधिक वाढली. देशात सध्या याचे ८ कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत. नेटफ्लिस्कवर ५ कोटींपेक्षा अधिक अकाउंट आहेत. ही आकडेवारी महत्त्वपूर्ण आहे. अमेरिकेत केबलचे अंदाजे ४ कोटी ८० लाख ग्राहक आहेत.  

नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन टेलिव्हिजनचे ठोस पर्याय नाहीत. यात थेट प्रक्षेपित कार्यक्रम दाखवले जात नाहीत. बातम्या आणि क्रीडाविषयक थेट प्रक्षेपण केबलची सर्वात मोठी खासियत आहे. व्हिडिआे स्ट्रीमिंगने याची भरपाई होऊ शकत नाही. अॅमेझॉनने नुकताच एनएफएल आणि टेनिस स्पर्धांचे थेट प्रक्षेपण दाखवण्याचा करार केला. काही ऑनलाइन कंपन्यांना थेट प्रक्षेपणात यश मिळाले आहे.  थेट प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांसह ते ऑन-डिमांड कंटेट आणि क्लाउड आधारित डीव्हीआरसारख्या सुविधा देतात. यांची पोहोच सध्या मर्यादित क्षेत्रांत आहे. यांचा प्रभावही संमिश्र दिसून आला. यूट्यूब टीव्ही देशभरातील १५ शहरांत उपलब्ध आहे. स्लिंग टीव्हीवर डिस्ने आणि ईएसपीएन दिसत नाही. डायरेक्ट टीव्ही १२० पेक्षा अधिक वाहिन्या उपलब्ध करून देते. यात लोकप्रिय वृत्तवाहिनी नाही.  

यांचा खर्च कमी आहे. वाहिन्यांच्या मागणीनुसार मासिक खर्च २० ते ७० डॉलर्सदरम्यान आहे. मात्र, केवळ लाइव्ह स्ट्रीमिंगमुळे लोकांच्या टीव्ही पाहण्याच्या सवयीत बदल होऊ शकत नाही. यासाठी चांगल्या हार्डवेअरची गरज आहे. अॅमेझॉन फायर टीव्ही, अॅपल टीव्ही आणि गुगल क्रॉमकास्टसारखे गॅजेट दर्जा वाढवण्याकडे लक्ष देत आहेत. सध्या अमेरिकेत १३ कोटींपेक्षा अधिक स्ट्रीमिंग बॉक्स वापरात आहेत. यासाठी ३५ ते १९९ डॉलर्सपर्यंत खर्च येतो. देशातील केबल ग्राहकांच्या संख्येपेक्षा हा आकडा तिप्पट आहे.  

स्ट्रीमिंग बॉक्सची लोकप्रियता वाढत आहे. मात्र, केबलच्या लोकप्रियतेत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे दर्जेदार स्क्रीनचे स्मार्ट टीव्ही येत आहेत. नुकतेच अॅमेझॉनद्वारे सादर केलेल्या एलिमेंट अॅमेझॉन फायर टीव्ही अॅडिशन स्मार्ट टीव्हीची किंमत ४५० डॉलर्सपासून सुरू होते. यात व्हॉइस असिस्टंट तंत्र आहे. याच्या मदतीने वाहिन्या बदलण्यापासून ते पसंतीचे चित्रपट पाहण्यापर्यंतचे पर्याय बोलून निवडता येतात. अॅमेझॉन फायर टीव्ही आणि अॅपल टीव्हीमध्येदेखील व्हॉइस कंट्रोल आहे. याच्या डिजिटल अँटेनाच्या कक्षेत येणारे कार्यक्रमच यावर पाहता येतात. स्थानिक वाहिन्यांचे कार्यक्रम पाहणेच अनेकदा बंधनकारक होते. हे कार्यक्रम विनाशुल्क असतात. केबल कंपन्या आपल्या देयकांमध्ये या फ्री टू एअर वाहिन्यांचे पैसेही घेतात, हे फार विचित्र आहे.  केबल कंपन्यांसाठी सर्वात मोठा धोका एलिमेंटच्या फायर टीव्हीसारख्या पर्यायामुळे आहे. अॅलेक्सा व्हॉइस कंट्रोलच्या माध्यमातून यावर कार्यक्रम बदलणे केवळ एका रिमोट कंट्रोलने शक्य आहे. 

अॅलेक्साच्या मदतीने स्मार्ट लाइट सुरू करणे, जोरात बातमी वाचणेही शक्य आहे. अशा सुविधा केबल ग्राहकांची पसंत पूर्णपणे बदलू शकतात.  केबल कंपन्या आपल्या मनमानी कारभारामुळे अडचणीत येतात. ग्राहकांची संख्या घटल्याने कमाई घटली.  भरपाईसाठी त्यांनी शुल्क वाढवले. याचे सर्वात मोठे उदाहरण ईएसपीएन आहे. डिस्नेची यावर मालकी आहे. येथे ग्राहकांची संख्या २०११ मध्ये १ कोटी २० लाखांनी घटली. या दरम्यान या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या क्रीडा स्पर्धांच्या प्रक्षेपणाचे परवाना शुल्क अनेक पटींनी वाढले. यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आणि टेलिव्हिजन ऑपरेटरपेक्षा अधिक पैसे त्यांनी आकारले. केबल कंपन्या या वाढत्या खर्चाचे आेझे ग्राहकांवर टाकतात.  ग्राहक अद्यापही निर्णय घेऊ शकत नाहीत. कारण यात अनेक बारीक अडथळे आहेत. केबल सोडून नवा टीव्ही किंवा स्ट्रीमिंग बॉक्स खरेदी करण्याचा निर्णय सोपा नाही. बहुतांश लोकांना यांच्या सेवा विश्वासार्ह वाटत नाहीत. केबल कंपन्यांसाठी कार्यक्रमाच्या दर्जात सुधारणा करणे अपरिहार्य आहे.

१४ वाहिन्यांचा मासिक खर्च ९५ डॉलर्स  
केबल ग्राहकांना आवडीच्या वाहिन्या पाहण्यास मिळत नाहीत. तरीही खर्च मात्र अधिक होतो. कॉमकास्टच्या पॅकेजमध्ये २२० वाहिन्या आहेत. यात ११५ एचडी टीव्हीवर पाहण्यालायक नसतात. बाकी १०५ पैकी सरासरी १८ वाहिन्या उपभोक्त्यांच्या आवडीच्या असतात. पैकी ४ फ्री टू एअर आहेत. केवळ १४ वाहिन्या पाहण्यासाठी ग्राहकांना सरासरी ९५ डॉलर्स मासिक खर्च येतो.  
बातम्या आणखी आहेत...