आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटीरतावाद्यांना भेटले पाकचे उच्चायुक्त; भारत म्हणाला,आता POK वरच चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानसोबत आता केवळ 'पीओके'वरच (पाक व्याप्त काश्मीर) चर्चा होईल, असे भारताचे उच्चायुक्त टीसीए. राघवन यांनी ठणकावून सांगितले आहे. राघवन यांनी सोमवारी रात्री एका कार्यक्रमात संबोधित केले. दरम्यान, पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी सोमवारी रात्री दिल्लीत कश्मीरमधील फुटीरतावाद्यांची भेट घेतली. त्यानंतर भारताने ही ताठर भूमिका घेतली आहे.
- पाकिस्तानने काश्मीरमुद्द्यावर चर्चा करण्‍यासाठी तयारी दर्शवली असली तरी भारत केवळ पाक व्याप्त काश्मीरवर (पीओके) चर्चा करणार आहे, हे आधी पाकिस्तानने लक्षात घ्यावे.
- दोन्ही देशाची फाळणी झाली तेव्हा भारताने काश्मीरचा मुद्दा प्रथम संयुक्त राष्‍ट्रात (UN) उपस्थित केला होता. तत्कालीन काळात देशात राजेशाही होती.
- काश्मीर हे भारताचे मुलभूत अंग आहे. सध्या त्यावर पाकिस्तानी लष्कराने ताबा घेतला आहे.

भारतीय उच्चायुक्तांची भूमिका महत्त्वाची...
- दोन्ही देशातील 'कॉम्प्रिहेंसिव्ह कम्पोजिट डायलॉग पुन्हा एकदा तयारी दर्शवली आहे.
- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी 10 डिसेंबरला इस्लामाबादमध्ये याबाबत घोषणा केली होती.
- मात्र, सुषमा इस्लामाबादहून परतल्यानंतर अवघ्या चार दिवसांत पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी सोमवारी रात्री दिल्लीत काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची भेट घेतली.
- काश्मीर मुद्द्यावर दोन्ही देशाच्या चर्चेत फुटीरतावाद्यांची मध्यस्थी नको असल्याचे भारताने आधीच स्पष्ट केले आहे.
- भारताने ताठर भूमिका घेतली आहे. पाकसोबतच्या चर्चेत पीओकेला प्राधान्य असेल.
- दोन्ही देशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- पाकिस्तानातून प्रकाशित होणार्‍या हेराल्ड मॅगझिनचे संपादक बदर आलम यांनी भारतावर निशाणा साधला आहे. दोन्ही देशासाठी काश्मीर हा वादातीत मुद्दा आहे. दोन्ही देशांनी सतर्कतेने यातून मार्ग काढायला हवा. वाद आणखी चिघळणार नाही, याची देखील काळजी घ्यायला हवी.
बातम्या आणखी आहेत...