आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३,२५२ कोटींची लॉटरी, १७०९ कोटी ट्रस्टला दान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉन्कर्ड - लॉटरी लागली की आपले नशीब फळफळले, आपला पांग फिटला असे समजून अनेक जण लॉटरीची तिकिटे विकत घेऊन नव्या जीवनाची स्वप्ने पाहत असतात. मात्र अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायरमधील एका कुटुंबाला ४८.७ कोटी डॉलर म्हणजेच सुमारे ३,२५२ कोटी रुपयांची फायरबॉल लॉटरी लागली. कर कपात करून त्यांना २५.६ कोटी डॉलर म्हणजेच सुमारे १,७०९ कोटी रुपये मिळाले. विशेष म्हणजे ही सर्वच्या सर्व रक्कम त्यांनी एका धर्मादाय संस्थेला दान करून टाकली.

लॉटरी अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, जॅकपॉट जिंकणाऱ्या कुटुंबाने आपले नाव गोपनीय ठेवण्याचा आग्रह धरला आहे. त्यांनी हे तिकीट न्यू हॅम्पशायरमध्ये केवळ १०,००० लोकसंख्या असलेल्या रेमंडस्थित हानाफोर्ड सुपर मार्केटमधून विकत घेतले होते. ३० जुलै रोजी लॉटरीचा निकाल जाहीर झाला आणि विजेत्या कुटुंबाने आता दावा केला.

विशेष म्हणजे हानाफोर्डनेही तिकीट विक्रीच्या कमिशनपोटी मिळालेली १ लाख डॉलरची रक्कम अनेक संस्थांना दान करून टाकली. त्यात रेमंड पोलिस विभाग आणि भोजनालयांचा समावेश आहे. हा अमेरिकेचा सर्वात मोठा आठव्या क्रमांकाचा लॉटरी जॅकपॉट आहे.
बातम्या आणखी आहेत...