आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Isis Video Show Mass Killings Of Ethiopian Christians

ISIS च्या दहशतवाद्यांची क्रूरता: 30 ख्रिश्चिनांची शिरच्छेद, गोळ्या झाडून केली हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो - दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (आयएसआयएस) लीबियात इथोपियन ख्रिश्चिनांची हत्या केल्याचा दावा केला रविवारी केला होता. याच्या संबंधित व्हिडिओही करण्‍यात आला. त्यात दहशतवादी 14 ओलिसांचा शिरच्छेद करतात आणि इतर 16 जणांची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्‍यात आल्याचे दिसत आहे.व्हिडिओ इस्लामिक स्टेटचे अल-फुर्कन मीडिया विंगकडून प्रसिध्‍द करण्‍यात आले आहे. याच वर्षी म्हणजे फेब्रूवारीत इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी लीबियाच्या समुद्रकिना-यावर इजिप्तचे 21 ख्रिश्चिनांची शिरच्छेद करुन हत्या केली होती. हजारो ख्रिश्चिनांनी लीबियातून स्थलांतर केले आहे.
29 मिनिटांच्या या व्हिडिओत शस्त्रधारी दहशतवादी काळे आणि नारंगी जंपसूट परिधान केलेले ओलीस दोन गटात दिसत आहे. असे मानले जाते, की पूर्व लीबियाच्या बर्का प्रांत आणि दक्षिण लीबियातील फज्जान प्रांतात ओलिसांची हत्या करण्‍यात आली आहे. व्हिडिओतील संदेशात म्हटले, की ते ख्रि‍श्चिन इथोपियन चर्चचे समर्थक असून ते इस्लामचे शत्रू आहे. व्हिडिओत दोन वेगवेगळ्या ठिकाणी ओलिस दाखवले आहे. नंतर दहशतवादी काही ख्रिश्चिनांना गोळ्या झाडून, तर दुस-या ठिकाणावरील ओलिसांचा शिरच्छेद करुन हत्या करण्‍यात आल्याचे दिसते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेची छायाचित्रे...