आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसची अमेरिकेला धमकी, न्यूयॉर्कवर हल्ल्याचा दिला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- अत्यंत क्रूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने जाहीर केलेल्या आपल्या नव्या व्हिडीओमध्ये अमेरिकेतील टाइम स्क्वेअरचे चित्रीकरण असून संघटनेचे आत्मघाती अतिरेकी न्यूयॉर्कवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे दाखवण्यात आले आहे. सुमारे साडेपाच मिनिटांच्या या व्हिडीओत प्रारंभी पॅरिसवरील हल्ल्याचे काही भयंकर दृश्य दाखवण्यात आले आहेत.
या व्हिडीओच्या शेवटी एक आत्मघाती अतिरेकी आपल्या जॅकेटमध्ये स्फोटके भरत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर अमेरिकेतील अत्यंत गजबजलेला टाइम स्क्वेअरचा परिसर दर्शवण्यात आला असून अतिरेकी स्फोटके उडवून देत असल्याचे दिसते आहे.
आता न्यूयॉर्क...
हा व्हिडिओ जुना असल्याचे मानले जात असले तरी अप्रत्यक्षपणे इस्लामिक स्टेटने आता आपले न्यूयॉर्क हे लक्ष्य असल्याचे दाखवून दिले आहे. अमेरिकेतील प्रत्येक बड्या शहरांत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्याने इतक्यात या शहरांना धोका नसल्याचे अमेरिकी प्रशासनाने म्हटले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, बॉम्बच्या भीतीने विमान उतरवले बल्गेरियात