आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थायलंडचे नवे राजे क्राऊन प्रिन्स महाराज वजिरालोंगकर्ण देशाचे नरेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक : थायलंडचे युवराज (क्राऊन प्रिन्स) महाराज वजिरालोंगकर्ण देशाचे नरेश असतील. त्यांच्या नावाला कॅबिनेटने मंजुरी देऊन संसदेकडे पाठवले आहे, संसदेची सदर प्रस्तावाला मंजुरी मिळणे शक्य आहे. महाराजा वजिरालोंगकर्ण यांना दीर्घ काळापासून राजा बनवले न जाण्याने अनेक प्रकारच्या अटकळी बांधल्या जात होत्या.
थाई नरेश भूमिबोल अतुल्यतेट यांचे १३ ऑक्टोबर रोजी निधन झाले होते. तेव्हापासून हे सिंहासन रिक्तच आहे. वजिरालोंगकर्ण थाईनरेश यांचे एकमेव पुत्र आहेत आणि त्यांना २८ डिसेंबर १९७२ रोजी देशाचा युवराज (क्राऊन प्रिन्स) घोषित केले गेले होते. ते सध्या जर्मनीत आहेत आणि बुधवारी ते बँकॉकला परतण्याची शक्यता आहे. उपपंतप्रधान प्रवित वोंगसुवान यांनी सांगितले की, उत्तराधिकार कायद्यानुसार प्रत्येक टप्पा वा शिडी चढत नव्या नरेशांची नियुक्ती केली जात आहे. पंतप्रधानांचे सचिव कॅबिनेटच्या विशेष बैठकीच्या निर्णयाची संसदेला माहिती करून देण्यात येईल. तेव्हा संसदेचे अध्यक्ष औपचारिक पद्धतीने युवराजांना सिंहासन सांभाळण्यासाठी आमंत्रित करतील. त्यांनी सांगितले की, संसदेचे अध्यक्ष एक वा दोन दिवसांतच युवराजांना भेटतील.
बातम्या आणखी आहेत...