आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक किलोचे माप होणार अधिक तोलामोलाचे, मिश्रधातूचे सिलिंडर आहे सध्या १ किलोचे प्रमाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - एक किलोग्रॅम वजनाची अधिक तंतोतंत व्याख्या करण्याची पद्धत शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. पहिल्यांदाच किलोग्रॅमच्या व्याख्येसाठी कोणत्याही भौतिक वस्तूचा संदर्भ देण्याची गरज भासणार नाही. सध्या फ्रान्समध्ये एका ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आलेल्या धातूच्या सिलिंडरच्या वजनाच्या इतक्या भाराला किलो मानले जाते; परंतु या सिलिंडरचे वजन दिवसेंदिवस कमी होत चालले असल्याने त्याची विश्वासार्हता कमी होत असल्याने शास्त्रज्ञांनी एक किलो वजनाचे अधिक विश्वासार्ह मानक विकसित केले असून २०१८ पासून एक किलो वजनासाठी हे नवे मानक जगभरात वापरले जाईल.

इटली, जपान आणि जर्मनीचे शास्त्रज्ञ अॅव्होगेड्रोच्या संख्येच्या दोन अत्यंत तंतोतंत मापनाचा सहसंबंध जोडून सरासरी मूल्य मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. भविष्यातील मोजमापासाठी त्याचाच वापर केला जाऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या या चमूने अॅव्होगेड्रोच्या संख्येची असंख्य वेळा गणना केली आहे. प्रत्येक वेळी शास्त्रज्ञांनी अत्यंत शुद्ध एक किलोग्राम सिलिकॉनमधील अणूंची गणना करून अॅव्होगेड्रोच्या संख्येचे मूल्य मिळवले आहे. ६.०२२ X१०२३ अशी अॅव्होेगेड्रोची संख्या आहे. ती पृथ्वीवर वाळूचे जेवढे कण आहेत किंवा ब्रह्मांडात असलेल्या ताऱ्यांच्या संख्येच्या कणांपेक्षाही मोठी आहे.

भौतिक सातत्याऐवजी भौतिक वस्तूवर निर्धारित असलेले किलोग्रॅम हे एकमेव आंतरराष्ट्रीय प्रमाण एकक आहे. उदाहरणार्थ आता धातूच्या दोन छिद्रांमधील अंतरावर मीटरची व्याख्या होत नाही. सध्या त्याची व्याख्या अशी : निर्वात पोकळीत प्रकाश सेकंदाच्या १/२९९७९२४५८ व्या भागात निश्चित झालेले अंतर म्हणजे एक मीटर आहे.
ज्यांच्या आधारावर वैज्ञानिक मोजमाप केले जाते त्या सात मूलभूत एककांपैकी किलोग्रॅमही एक एकक आहे. अन्य सहा एककांमध्ये मीटर, सेकंद, अॅम्पियर, केल्विन, मोल आणि कँडिलाचा समावेश आहे. ज्यांचा क्रमश: लांबी, वेळ, प्रवाह, तापमान, रासायनिक संयुग आणि प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वापर होतो.
मिश्रधातूचे सिलिंडर आहे सध्या १ किलोचे प्रमाण
सध्या एक किलोग्रॅम वजनासाठी जगभरामध्ये वापरले जाणारे मानक १२५ वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आले होते. प्लॅटिनम आणि इरेडियम या मिश्रधातूपासून तयार केलेल्या एक सिलिंडरच्या वजनाइतका भार म्हणजे एक किलो असे मानक निश्चित करण्यात आले आणि संपूर्ण जगाने ते स्वीकारलेही आहे. हे सिलिंंडर गोल्फच्या चेंडूच्या आकाराचे आहे. फ्रान्समधील सेव्हर येथील आंतरराष्ट्रीय ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
विश्वासार्हता ढासळल्याने नवीन पद्धत : जगभराने १ किलोचे मानक मानलेल्या सिलिंडरचे वजन सातत्याने घटत आहे. त्याचे नेमके कारण समजलेले नाही; परंतु सिलिंडर तयार करताना आत राहिलेला वायू हळूहळू निघून जात असल्यामुळे वजन कमी होत चालले असावे, असा अंदाज आहे. त्यामुळे या सिलिंडरचे वजन अचूक राहिले नाही.म्हणून एक किलो वजनाचे ते मानक मानले जाऊ शकत नाही, असे शास्त्रज्ञांना वाटत आहे.
एक किलो वजनाचे अाता स्थिर एकक
इंटरनॅशनल प्रोटोटाइप किलोग्रॅम संबोधल्या जाणाऱ्या धातूच्या तुकड्यांऐवजी प्रमाण व आण्विक भौतिकशास्त्राचा वापर करून किलोग्रॅमची स्थिर स्वरुपाची तंतोतंत परिभाषा निश्चित केल्यास भविष्यात आतासारखी अडचण उद्भवणार नाही. कारण बदलत्या काळानुसार भौतिक वस्तूमध्ये बदल होऊ शकतो, तसे अणूच्या बाबतीत घडत नाही.
बातम्या आणखी आहेत...