आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिप्री’चा अहवाल: पाकिस्तानकडे 110 ते 130, भारताकडे 100 ते 120 बॉम्ब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अणुबॉम्ब आहेत. याबाबतीत त्याने इस्रायल आणि उत्तर कोरिया यांनाही मागे टाकले आहे, असा अहवाल स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिप्री) दिला आहे.

या थिंक-टँकने अण्वस्त्र साठ्यांची वार्षिक माहिती जारी केली आहे. त्यानुसार पाकिस्तानकडे ११० ते १३० अणुबॉम्ब आहेत, तर भारताकडे १०० ते १२० अणुबॉम्ब आहेत. अमेरिका आणि रशिया हे आपल्या अण्वस्त्र साठ्यांत हळूहळू कपात करत असले तरी ते आपल्या क्षमतेला अत्याधुनिक रूप देत आहेत. इतर अण्वस्त्र सज्ज देशांकडे कमी अणुबॉम्ब आहेत, पण त्यांनी अणुबॉम्ब डागण्याची नवी यंत्रणा तैनात केली आहे किंवा तशी इच्छा व्यक्त केली आहे.
अहवालात म्हटले आहे की, चीनही हळूहळू अण्वस्त्र साठ्यात वाढ करत आहे. तसेच त्याचे आधुनिकीकरण करत आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देशही अणुबॉम्बचा साठा तसेच क्षेपणास्त्र डागण्याच्या क्षमतेत वाढ करत आहेत. उत्तर कोरियाकडे १० अणुबॉम्ब बनवता येतील एवढे साहित्य आहे. मात्र उत्तर कोरियाने अणुबॉम्ब तयार केले आहेत की नाहीत हे स्पष्ट नाही. २०१६ च्या सुरुवातीला अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्रायल आणि उत्तर कोरिया या नऊ देशांकडे केव्हाही हल्ला करण्यास सज्ज असलेले, तैनात केलेले ४,१२० अणुबॉम्ब आहेत.

देश वर्ष २०१५ वर्ष २०१६
भारत: १००-१२० बॉम्ब ९०-११० बॉम्ब
पाकिस्तान ११०-१३० बॉम्ब १००-१२० बॉम्ब

एनएसजीच्या सदस्यत्वाबाबत पाकचा दावा भक्कम : अजीज
इस्लामाबाद- अणु पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी भारतापेक्षा पाकिस्तानची बाजू जास्त भक्कम आहे, असा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र विषयात सल्लागार सरताज अजीज यांनी केला आहे. अजीज यांनी ‘द डॉन’ या वृत्तपत्राला सांगितले की, एनपीटीवर स्वाक्षरी केलेल्या देशांना सदस्यत्व देण्यासाठी समान निकष लावण्याबाबत एनएसजीच्या सदस्य देशांचे एकमत झाले तर पाकची बाजू भारतापेक्षा जास्त मजबूत आहे. गुणवत्तेच्या आधारावर एनएसजीचे सदस्यत्व मिळण्याची पाकिस्तानला जास्त संधी आहे. भारताने अर्ज दाखल केल्यानंतर आपण अर्ज दाखल करायचा अशी आमची व्यूहरचना होती, ती आम्ही साध्य केली. तीन महिन्यांपासूनच आमचा अर्ज तयार होता.