आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नन्सीचे विश्व आता बदलणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे फार कमी लोकांना माहिती आहे की, दरवर्षी जगातील शेकडाे मुलींचा जन्म गर्भाशयाशिवाय होतो. नव्या पद्धतीच्या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून आता डाॅक्टर्स या महिलांचे आयुष्य बदलण्याची आशा करत अाहेत. सप्टेंबर महिन्यात डलासच्या बेलोर मेडिकल सेंटर, ४ अमेरिकन महिलांना जीवंत डोनर्सचे गर्भाशय ट्रांसप्लांट केले. अमेरिकेतील ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.
जीवंत डोनर्सचे गर्भाशय ट्रांसप्लांट प्रथमच यशस्वी झाले आहे. या संदर्भात स्वीडन अग्रेसर आहे. तेथे गर्भाशय ट्रान्सप्लांट झालेल्या ९ पैकी पाच महिलांनी चांगल्या मुलांना जन्म दिलेला आहे. एक महिला तर दुसऱ्या वेळी गर्भवती आहे. बेलोरमध्ये ज्या चार महिलांचे गर्भाशय ट्रान्सप्लांट झाले,त्यापैकी तीन महिलांचे गर्भ काढावे लागले कारण त्यांच्यात रक्ताचा प्रवाह सामान्य नव्हता. प्रायाेगिक तत्वावर अवयवांचे केले जाणारे ट्रान्सप्लांट ही एक सामान्य प्रक्रिया आहे. चौथ्या महिलेत आतापर्यंत काही गडबड झालेली नाही.जर अशीच परिस्थिती राहिली तर एक वर्षाच्या आत ती इन विट्रो फर्टिलायजेशन च्या माध्यमातून गर्भवती बनण्याचा प्रयत्न करू शकते. शस्त्रक्रियेच्या दरम्यान अंडाशयांचा संबंध गर्भाशयाशी जाेडला जाऊ शकत नाही, यासाठी प्रेग्नन्सीसाठी आयव्हीएफची गरज आहे.
बेलोरचे सर्जन डॉ. गुइलियानो टेस्टा यांच्या मते, या सर्जरीचे परिणाम निराशाजनक आहेत. वैद्यकीय क्षेत्रात एका महान इतिहासाची ही एक सुरूवात आहे. गर्भाशय दान करणाऱ्या महिलांनी परोपकारेच्या भावनेतून हे पाऊल उचलले आहे. त्या अनोळखी महिलेला गर्भवती होण्याची संधी उपलब्ध करून देऊ इच्छितात. रिसिव्हर आणि डोनर यांच्यात कोणतेही नाते नाही. त्या एकमेकांना ओळखतही नाहीत. अंदाजे ५० महिलांनी स्वेच्छेने गर्भाशय दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे भविष्यात अाणखी शस्त्रक्रियांचा मार्ग सोपा होईल. डॉ. टेस्टा म्हणतात की , या महिला अदभुत आहेत.
अमेरिकेत हे दुसऱ्यांदा गर्भाशय ट्रान्सप्लांट केले गेले आहे. पहिल्यांदा फेब्रुवारीत एका मृतदेहाचा अवयव घेण्यात आला होता. ऑपरेशननंतर दोन आठवडयांच्या आत संबंधित रूग्णाला इन्फेक्शन झाले आणि रोपण केलेला अवयव काढून टाकावा लागला. बेलोर सेंटरमध्ये या वर्षाअखेर सहा गर्भाशय ट्रान्सप्लांट करण्याची योजना आहे.यासाठी सतत परीक्षणेही होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...