आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेकडून उत्तर कोरियाची जहाजे, चिनी व्यापारावर नवे निर्बंध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हाइट हाऊसच्या रोझ गार्डनमधील एका समारंभात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. सोबत प्रथम महिला मेलानिया. - Divya Marathi
व्हाइट हाऊसच्या रोझ गार्डनमधील एका समारंभात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. सोबत प्रथम महिला मेलानिया.

वॉशिंग्टन- अमेरिकेने उत्तर कोरिया व चिनी व्यापारावर नवे निर्बंध लादले आहेत. उत्तर कोरियाने अापला अणु कार्यक्रम रोखावा, यासाठी अमेरिकेने या माध्यमातून दबाव आणखी वाढवला आहे.  


उत्तर कोरिया दहशतवादाचा प्रायोजक आहे, असे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने ही भूमिका जाहीर केली आहे. त्याशिवाय उत्तर कोरियासोबत व्यापार करणाऱ्या चिनी कंपन्यांवरही अमेरिकेने निर्बंध घातल्याचे जाहीर केले आहे. आम्ही उत्तर कोरियाची मालवाहू जहाजे तसेच इतर सागरी वाहतूक यांनाही प्रदेशात बंदी घालत आहोत. ट्रम्प यांनी निर्बंधाचा हे पहिले पाऊल टाकले आहे. आता पुढील आठवड्यात कोरियावर जास्तीत जास्त दबाव टाकला जाईल. त्यामुळे किम जाँग उन यांच्या हुकूमशाही सरकारला मान झुकवावी लागेल, अशी रणनीती आखण्यात आली आहे. नवीन निर्बंधांच्या यादीत एक वैयक्तिक, १३ व्यापारी आस्थापना, २० जहाजांचा समावेश आहे. त्याशिवाय अमेरिकेच्या न्यायकक्षेत येणारी काेरियाची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही निर्बंधात आहे.


अमेरिकेची  चूक : चीन  
उत्तर काेरियासोबतच्या चिनी व्यापार संस्थांंवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. ही कृती पूर्णपणे चुकीची आहे. अशा प्रकारच्या व्यापाराबाबतचा पुरावा अमेरिकेने द्यावा. वास्तविक देशांतर्गत कायद्याच्या बळावर इतर देशांवर निर्बंध लादण्याच्या कृतीला आमचा नेहमीच विरोध राहिलेला आहे, असा टोला चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी लगावला.  


चीन बधेना  
कोरियाला वेसण घालण्यासाठी चीनची पूर्ण सोबत असणे गरजेचे आहे. त्यासाठीच ट्रम्प यांनी या महिन्याच्या सुरुवातीला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेऊन चर्चेत कोरियासोबतचा व्यापार थांबवण्याचे मत मांडले होते. परंतु त्यानंतरही चीनने उत्साहकारक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. चीन बधत नसले तरी अमेरिकेने भूमिका बदलली नाही. 


चीनचा प्रस्ताव नाकारला  
चीनने अमेरिकेला दक्षिण कोरियातील आपला सैन्य सराव थांबवण्याचा सल्ला दिला आहे, तर दुसरीकडे उत्तर कोरियाला अणु कार्यक्रम रोखण्यास सांगितले होते. या तत्त्वावर तोडगा निघेल, असा प्रस्ताव चीनने ठेवला आहे. परंतु अमेरिकेला हा प्रस्ताव मान्य नाही. तडजोडीचा हा प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला आहे. 

बातम्या आणखी आहेत...