आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS ने जारी केला ख्रिश्चनांच्या कत्तलीचा नवा व्हिडिओ; जगभर खळबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिपोली | इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेने दोन महिन्यांपूर्वी लिबियामधील एका समुद्रकिना-यावर इजिप्तमधील ख्रिश्चनांचा ज्या पद्धतीने शिरच्छेद केला, तशाच पद्धतीने अनेक ख्रिश्चनांची कत्तल करण्यात आल्याची एक चित्रफीत आयसिसने जाहीर केली आहे.

नव्या चित्रफितीमध्ये इथिओपियन ख्रिश्चनांची कत्तल केल्याचे स्पष्ट दाखवण्यात आले आहे. एका चर्चमधून या लोकांचे अपहरण करण्यात आले होते. ३० मिनिटांच्या या चित्रफितीमध्ये आयएसचे दहशतवादी इथिओपियन ख्रिश्चनांची लिबियामधील एका समुद्रकिना-यावर हत्या करताना दिसत आहेत. त्यांना डोक्यात गोळ्या घालून मारण्यात आले. ख्रिश्चनांच्या बालेकिल्ल्यांत घुसून तेथील पुरुषांना मारून टाकू व महिला-मुलांना गुलाम बनवू, अशी धमकीही टि्वटरवर देण्यात आली आहे. इराक आणि सीरियामध्ये वर्चस्व असलेल्या आयएसने आता आपला मोर्चा लिबियाकडे वळवला असून ३० इथिओपियन ख्रिश्चन लोकांना या देशातून पकडून ठार मारण्यात आले. या हत्याकांडाला अद्याप दुजोरा मिळाला नसला तरी इसिसची यापूर्वीची क्रूर कृत्ये पाहता व्हिडिओत तथ्य असल्याचे मानले जात आहे.