आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याहूच्या नव्या सीईओंचे काम निम्मे, पॅकेज दुप्पट; थॉमस यांचे वार्षिक पॅकेज 184 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- याहू आपला कोअर बिझनेस व्हेरिझॉन कंपनीला विकत आहे. हा व्यवहार लवकरच पूर्ण होणार आहे. उर्वरित व्यवसाय चालवण्यासाठी कंपनीने नवा सीईओ नेमला आहे. यातील गमतीची गोष्ट म्हणजे नव्या सीईओंकडे काम निम्मेच राहील, मात्र वेतनाचे पॅकेज विद्यमान सीईओ मारिसा मायर यांच्यापेक्षा अंदाजे दुप्पट असेल. मारिसा यांच्या जागी थॉमस मॅकइनर्नी याहूचे नवे सीईओ असतील. सध्या ते झेनवर्थ फायनान्शियलचे सीईओ आहेत. याचे मार्केट कॅप १२,५०० कोटी आहे.

मॅकइनर्नी यांचे मूळ वेतन १३.२ कोटी असेल. मारिसा यांचे वेतन याच्या निम्मे ६.६ कोटी रु. होते. नव्या सीईओंना वेतनासोबत बोनसही मिळेल. म्हणजे पहिल्या वर्षी एकूण २६.४ कोटी रुपये मिळतील. हे वेतन मारिसा यांच्या गेल्या वर्षीच्या मूळ वेतन व बोनसच्या (१९.८ कोटी) २५% अधिक आहे. मॅकइनर्नी यांना १५८ कोटींच्या स्टॉक ऑप्शनचीही तरतूद आहे. मारिसा यांना २०१५ मध्ये निम्मा स्टॉक मिळाला होता. कामाची तुलना करता जुलै २०१२ मध्ये मारिसा सीईओ झाल्या तेव्हा त्यांच्यासमोर कंपनीचा कमी होत चाललेला मीडिया बिझनेस सावरण्याचे आव्हान होते. यात इंटरनेट पण आहे. 

नव्या सीईओंसमोर असे कोणतेही आव्हान नाही. तंत्रज्ञान आणि जाहिरातींचा बिझनेस विकला गेल्यानंतर उरलेला बिझनेस याहू आता ‘अल्टाबा’ नावाने चालवेल. नवी शेअर खरेदी आता होणार नाही, जुनेही विकणार नाही अशी कंपनीची भूमिका असेल. म्हणजेच मॅकइनर्नी यांना काहीच काम राहणार नाही. जुन्या बिझनेसच्या देखरेखीसाठी केवळ एक विश्वस्त म्हणून ते काम पाहतील. फंड मॅनेजर म्हणूनही त्यांचे हे पॅकेज खूपच आहे. याहूची सर्वच गुंतवणुकीचे मूल्य ४ लाख कोटी आहे. तुलनात्मक पाहिले तर ३३० लाख कोटी रुपयांच्या फंडाचे व्यवस्थापन करणाऱ्या ब्लॅकरॉक कंपनीचे सीईओ लॅरी फिंक यांचे मूळ वेतन २०१५ मध्ये ५.९ कोटी होते. त्यांचे एकूण पॅकेज १७१ कोटींचे होते.

३ लाख कोटींचे मार्केट कॅप; याहूचा बिझनेस ३२,००० कोटींत विकला
याहूने २००५ मध्ये ‘अलिबाबा’मध्ये १ अब्ज डॉलर खर्चून (सध्या ६,६०० कोटी रु.) ४०% शेअर खरेदी केले होते. तेव्हा अलिबाबाची लिस्टिंग झालेली नव्हती. आता याहूचा वाटा १५% आहे आणि अलिबाबाचे मार्केट कॅप १७.५ लाख कोटी आहे. या याहूचे मूल्य २.६ लाख कोटी होते. याहूचे मार्केट कॅप सुमारे ३ लाख कोटी आहे. व्हेरिझॉन यातील कोअर बिझनेस फक्त ३२,००० कोटींत खरेदी करत आहे.
बातम्या आणखी आहेत...