आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्कच्या महिला बायकर्स शहर, परिसरातून जमा करतात ब्रेस्ट मिल्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - आजकाल प्रत्येक शहरात बायकर्स ग्रुप दिसतील, पण अमेरिकेत सायरन्स बायकर्स ग्रुप असून त्याचा उद्देश नवजात मुलांसाठी ब्रेस्ट मिल्कची व्यवस्था करणे हा आहे. ५० महिलांचा हा गट शहर आणि आसपासच्या परिसरातून ब्रेस्ट मिल्क गोळा करतो. नंतर ते न्यूयॉर्क मिल्क बँकेत पोहोचवतात. त्यांना बँकेकडून एक यादी मिळते. या यादीत नोंद असलेल्या रुग्णालयात जाऊन गरजू नवजातांना त्या हे दूध देतात. गटातील एक महिला सरासरी १३-१४ लिटर दूध आणतात.
गटात २५ ते ७४ वर्षे वयापर्यंतच्या महिला
गटाच्या अध्यक्षा जेन बेक्विटल यांनी १९८६ मध्ये त्याची स्थापना केली होती. त्या वीकेंडला गटाने फिरायला जात. पण गेल्या वर्षी मिल्क बँकेच्या अध्यक्षा ज्युली हॉर्वित्झ यांच्या भेटीनंतर सायरन्सला हेतू गवसला. ज्युली यांनी जेनला सांगितले की, माझ्या बँकेत नेहमी दूध असते, तरीही कमतरतेअभावी शहरात अनेक मुलांचा मृत्यू होतो. ब्रेस्ट मिल्क घेऊन जाण्याचा खर्चच एवढा आहे की लोक त्यासाठी तयार होत नाहीत. त्यानंतर बायकर्स ग्रुप आणि बँकेने सोबत काम करणे सुरू केले. बायकर्स ग्रुप हे काम मोफत करण्यास तयार आहे, पण बँक त्यांना इंधनाचा खर्च देते.

बायकिंग ही आधी आवड होती, आता हे मिशन आहे
बायकर्स ग्रुपच्या सदस्य सँड्रा फ्लेमिंग म्हणतात, ‘मी आधी आवड म्हणून गटाशी जोडलेले होते, पण आता मला मिशन मिळाले आहे. अनेकदा नोकरीमुळे मला वेळ मिळत नाही. तेव्हा मी सकाळी किंवा सायंकाळी उशिरा काम करते, पण कधीही त्याची जबाबदारी टाळत नाही. ’
बातम्या आणखी आहेत...