आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नात येऊन छातीवर बसत होते भूत, कॅमेऱ्यात टिपले असे काही...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या अॅडम एलिस नावाच्या एका व्यक्तीला वारंवार त्याच्या स्वप्नात एक भूत दिसत होते. हे भूत एका बाळाचे होते. तो भूत नेहमीच त्याच्या स्वप्नात येऊन त्याला घाबरवत होता. कित्येकवेळा तो कथितरीत्या त्याला मारण्याचा देखील प्रयत्न करत होता. काही दिवसांतच त्याला स्वप्नात दिसणारे बाळाचे भूत आपल्या खोलीत प्रत्यक्षही असल्याचा भास झाला. भूताच्या भितीने जगणे कठिण झाल्यानंतर अखेर त्याने आपल्या बेडरुम आणि इतर खोल्यांमध्ये कॅमेरे लावले. त्यानंतरच हे धक्कादायक फोटोज आणि व्हिडिओ समोर आले आहेत. 
 
कॅमेऱ्यात जे टिपले ते स्वप्नात येणाऱ्या बाळाचेच भूत असल्याचा दावा अॅडम करत आहे. मेलेले बाळ भूत होऊन त्याच्या स्वप्नात अर्ध्या रात्री येते. त्याने पुरावा म्हणून ट्विटरवर काही फोटोज आणि व्हिडिओ देखील जारी केले. त्यामध्ये खुर्च्या आणि वस्तू आपो-आप हालताना दिसून येतात. तसेच सोफ्यावर एक कथित भूत बसलेला दिसून येतो. उल्लेखनीय बाब म्हणजे, अॅडमने यापूर्वीही आपल्या गॅरेजमध्ये परालौकिक शक्ती असल्याचा व्हिडिओ याच वर्षी जारी केला होता. सोशल मीडियावर तो खूप व्हायरल झाला होता. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, त्या कॅमेऱ्यात टिपलेले फोटोज आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...