आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पिटलमध्ये हसतोय न्यूयॉर्क हल्ल्याचा दहशतवादी, त्याला रुग्णालयात हवाय ISISचा झेंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क - न्यूयॉर्क प्रांताच्या मॅनहॅटन शहरात ट्रक हल्ला करणारा दहशतवादी सैफुल्लो साइपोव्ह याला आपल्या रुग्णालयाच्या खोलीत दहशतवादी संघटना इसिसचा झेंडा हवा आहे. न्युयॉर्कमध्ये बुधवारी जे काही घडले, त्यावर सैफुल्लो अतिशय आनंदी आहे. एवढेच नव्हे, तर जखमी अवस्थेत रुग्णालयात असलेला सैफुल्लो अक्षरशः आपल्या कृत्यावर हसत आहे असे पोलिसांनी सांगितले. सैफुल्लोने आपल्या ट्रकने 8 जणांना चिरडून मारले. तसेच इतर 12 जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळीच पोलिसांनी त्याच्या पोटात गोळी झाडली होती. त्यामुळे, तो सध्या रुगणालयात उपचार घेत आहे.
 
ट्रम्प म्हणाले, त्याला मृत्यूदंड द्या...
- वृत्तसंस्थेने न्यूयॉर्कच्या एका दैनिकाचा दाखला देत दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी सैफुल्लो रुगणालयात मुक्तपणे बोलत आहे. तो हसतही होता. त्याने बुधवारी जे काही केले त्यावर तो आनंदी आहे. त्याला आपण केलेल्या सैतानी कृत्याचे समाधान वाटत आहे.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी ट्वीट करून हल्लेखोरावर संताप व्यक्त केला. 8 निष्पाप लोकांचा बळी घेणारा आणि 12 जणांना गंभीर जखमी करणारा दहशतवादी रुगणालयात हसत आहे. रुग्णालयात इसिसचा झेंडा लावण्याची मागणी करणाऱ्या या नराधमाला मृत्यूदंड द्यायला हवा असे ट्रम्प यांनी व्यक्त केले. 
 
पुढील स्लाइड्सवर, घटनास्थळाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...