आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाढी-मिशा असलेली मुलगी, मोठी खुर्ची विक्रमाचे दावेदार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड््सने आपली ६२ वी आवृत्ती जारी केली आहे. या वेळी जगभरातील चार हजारपेक्षा जास्त अद्भुत विक्रमांना आवृत्तीत स्थान मिळाले आहे. या वर्षी सर्वात लांब मांजरीपासून ५६ फूट उंच खुर्चीपर्यंतच्या आगळ्यावेगळ्या विक्रमांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. सर्वात वेगळी ठरली हरनाम कौर. इटलीच्या दिमित्री पेनसिएराने एकाच कोनावर १२१ आइस्क्रीम स्कूब बॅलन्स करण्याचा विक्रम केला. अशाच काही विक्रमांविषयी...

वेगळ्या आजारामुळे झाला विक्रम
ब्रिटनच्याहरनामला गिनीजमध्ये ‘दाढी असणारी सर्वात तरुण मुलगी’ असा किताब देऊन समावेश केला आहे. तिला ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम’ आहे, त्यामुळे चेहऱ्यावर केस येतात. टीका होऊनही हरनामने त्याचा मुकाबला केला आणि केस कापण्याचा निर्णय घेतला. हरनामने या वर्षी आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये रॅम्पवॉकही केले.

गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड्ची ६२ वी आवृत्ती जारी; सर्वात लांब मांजर, ५६ फूट उंच खुर्चीसारख्या वस्तूंचा समावेश...

बातम्या आणखी आहेत...