आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेख फेरारीतून फिरत होते, तेल विकत होते आता उघडताहेत डेअरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अल खर्ज (द न्यूयॉर्क टाइम्सशी विशेष करारांतर्गत फक्त दिव्य मराठीत) - त्रस्त करणारी गरमी, सूर्य मावळलाच होता की उम रशीदने आपले छोटेसे दुकान उघडले आणि दररोजप्रमाणे स्वस्त ज्वेलरी विकणे सुरू केले. ती म्हणते आहे की, पतीच्या निवृत्तिवेतनात आता भागत नाही. दुकान चालवणे भागच झाले आहे. प्रत्येक वस्तूंचे भाव वाढत आहेत आणि सुविधा मात्र कमी होताहेत. उम सांगते की, गेल्या रमजानमध्ये वीजजोडणी कापली गेली. कारण आम्ही वीज बिल भरू शकलो नाही. उंट विजेशिवाय राहू शकतो, आम्ही नाही. ही व्यथा फक्त उमचीच नसून संपूर्ण सौदी अरेबियाचीच आहे. सौदीची परिस्थिती खराब आहे. अर्थव्यवस्था कोसळली आहे. तेलाच्या जोरावर अरब देशांमध्ये सत्ताप्रभाव राखणाऱ्या सौदीला आता अर्थव्यवस्था वाचवणे अवघड झाले आहे. त्यांनी सरकारी खर्चात मोठी कपात केली आहे, योजनांसाठी कमी पैसा आणि सामान्यांवर अधिक कर लावण्यासारखे उपाय करावे लागत आहेत. फेरारीतून फिरणारे आणि लाखो रुपयांचे सोने घालणारे शेख आता दुसरा पर्याय शोधताहेत. यामुळे सौदी सम्राटचा तरुण पुत्र प्रिन्स मोहंमद बिन सलमानने डेअरी कंपनी
उर्वरित पान लाइफ मॅनेजमेंट
स्थापली आहे आणि तेथील दूध देशभरात वितरित केले जाते. ते म्हणतात, अशाच उद्योगांच्या बळावर ते अर्थव्यवस्थेला रुळावर आणतील. पण आता लोकांना मात्र कठोर मेहनत करण्यासाठी तयार राहावे लागेल.

तेलाची सातत्याने कमी होणारी किंमत आणि येमेनमधील वाढत्या गृहयुद्धाने सौदीला कमकुवत करून टाकलेय. त्यामुळे त्यांचे लक्ष आता डेअरीसारख्या उद्योगावर आहे आणि यास व्यवस्थितरीत्या चालविण्यासाठी तिथे मोठे प्रयत्न सुरू आहेत. सौदीची अलमाराई डेअरी वाळवंटी भूमीत स्थापित केली गेली आहे आणि तिथे एक लाख ८० हजार गायी आहेत. त्यांच्यासाठी आधुनिक शेड तयार केले गेले आहेत. जे नेहमीच थंड राहतात. खोलीवर घेतलेल्या बोअरवेलच्या द्वारे कुलिंग प्लँटपर्यंत पाणी पोहोचवले जाते. अर्जेंटिनाच्या मदतीने रेफ्रिजनरेशन सिस्टिम तयार केली गेली आहे. जिथे गायींचे दूध साठवले जाते तिथूनच थंड दूध ९,००० वाहनांद्वारे देशभर पुरवठा केला जातो.
असेच अनेक प्रकारचे उपाय शोधले जात आहेत. सरकारने खर्चात मोठी कपात सुरू केली आहे. अनेक सार्वजनिक योजनांच्या बजेटमध्ये कपात झाली आहे आणि अनेक मोठे प्रकल्प बंद केले गेले आहेत. गेल्या वर्षी सरकारची अर्थसंकल्पीय तूट होती १०० अब्ज डॉलरची. तेलाच्या किमती पडल्याने तेलाच्या पैशांवरील सर्वच उद्योगही बंद पडलेत. सौदीची परकीय गंगाजळीही २५ टक्क्यांनी घटली आहे आणि सरकारने विदेशी बँकांमधून मोठे कर्ज घेऊन ठेवले आहे. आता ते ग्लोबल बाँड मार्केटमधून कर्ज घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मंत्र्यांचे वेतन कमी केले आहे. नव्या भरतीवर बंदी आहे. हा लोकांना एक झटकाच आहे. बाहेरील लोकांना हाकलून देऊन त्या जागी स्थानिक लोकांना नोकऱ्या देण्याचे असले तरी सौदीत नोकरी करणे अपमानाचे गैरप्रतिष्ठेचे समजले जाते. आता लोकांना विदेशींच्या जागी स्वत:ला काम करावे लागते आहे. सौदी प्रिन्स यांना वाटते की लोकांनी आता बदलावे, मेहनतीला तयार व्हावे. अनेक तज्ज्ञांनीही अशीच मते नोंदविली आहेत.
अशा वेळी सौदीच्या युवराजांना अलमाराई डेअरी हीच एक विश्वसनीय ब्रँड दिसत आहे. या वर्षी तिथे ८९१ कोटी रुपयांचे उत्पन्न होण्याचे अनुमान आहे.
बातम्या आणखी आहेत...