आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडमध्ये जन्मलेला स्टोक्स इंग्लंडचा आधारस्तंभ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इं ग्लंडचे दोन सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू इयान बॉथम आणि अॅंड्रयू फ्लिंटॉफ नेहमी या खेळाडूची स्तुती करत असतात. फ्लिंटॉफच्या निवृत्तीनंतर त्याने त्याची जागा भरून काढली. २५ वर्षीय बेन स्टोक्सची आपण चर्चा करत आहोत. या युवा खेळाडूची वेगवान गोलंदाजीसह जबरदस्त फटकेबाजी करण्यासाठी अोळख निर्माण झाली आहे. मैदानावरील त्याची आक्रमकतासुद्धा स्टोक्सची ओळख झाली आहे.  
 
४ जून १९९१ रोजी क्राइस्ट चर्च (न्यूझीलंड) येथे जन्मलेला स्टोक्स न्यूझीलंडकडून खेळताना दिसला असता. मात्र, तो १३ वर्षांचा असताना त्याच्या रग्बीपटू वडिलांना इंग्लंडमध्ये एका रग्बी क्लबला कोचिंग देण्याची नाेकरी मिळाली. स्टोक्सचे वडील गेरॉर्ड न्यूझीलंडकडून रग्बी खेळायचे. तर आई देबोराह न्यूझीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाची सदस्य होती.
 
 स्टोक्ससुद्धा १२ वर्षे न्यूझीलंडमध्ये होता, तोपर्यंत त्याची रुची या दोन्ही खेळांत होती. शाळेकडून तो रग्बी आणि क्रिकेट दोन्ही खेळायचा. मात्र, इंग्लंडमध्ये आल्यानंतर त्याचा रस क्रिकेटमध्ये वाढला. येथे आल्यानंतर त्याने रग्बी सोडून क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. एक वेळा त्याच्यावर क्रिकेट सोडण्याचीसुद्धा वेळ आली होती. त्याच्या वडिलांची नाेकरी गेली. एक वर्ष त्यांच्याकडे उत्पन्नाचे कसलेच साधन नव्हते. अशात ते स्टोक्सच्या क्रिकेटचा खर्च उचलण्यात असमर्थ होते. 
 
यादरम्यान एक परोपकारी व्यक्ती स्टोक्सच्या जीवनात आला. त्याने स्टोक्सच्या प्रतिभेला ओळखले आणि त्याला कोचिंगची सुविधा देण्याचा प्रस्ताव दिला. येथून स्टोक्सच्या जीवनात क्रिकेटचा अध्यायाला सुरुवात झाली. या परोपकारी व्यक्तीला स्टोक्स आणि त्याची पत्नी क्लेअर रेटक्लिफ यांच्याशिवाय कोणीच ओळखत नाही. १४ व्या वर्षी क्रिकेटमध्ये करिअर बनवण्याचा निर्णय घेणाऱ्या स्टोक्सने १९ व्या वर्षी इंग्लंडच्या अंडर-१९ संघात स्थान मिळवले. स्टोक्स स्वभावाने मैदानात खूप आक्रमक असतो.
 २०१४ मध्ये एका सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर रागाच्या  भरात त्याने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन लॉकर रूमला जोऱ्याने मारून हाताचे बोट फ्रॅक्चर केले होते. याआधी एका क्रिकेट क्लबमध्ये त्याचे हाडही मोडले होते. या आक्रमक स्वभावामुळे त्याचे सहकारी त्याला अनेकदा रॉकी, हर्ट लॉकर आणि स्टोक्सी नावाने बोलवतात. आपल्या आक्रमक स्वभावामुळे त्याला डब्ल्यूडब्ल्यूई खूप आवडते. त्याने अनेकदा या फाइटचा आनंद लुटला आहे.  
खाण्यात तो ऑम्लेट चवीने खातो. ही त्याची फेव्हरेट डिश आहे. त्याच्या जीवनातसुद्धा एक लाजिरवाणा क्षण आला. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरला होत होता. त्या फोटोत तो स्पोर्टस ब्रा घालून दिसत होता. त्याला याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. ही स्पोर्टस ब्रानसून जीपीएस ट्रॅकर लागलेला पोशाख आहे, असे त्याने स्पष्ट केले. क्रिकेट आणि रग्बीशिवाय गोल्फमध्येसुद्धा त्याचा रस आहे. अनेक वेळा  तो गोल्फ कोर्सवर दिसला आहे. याबाबतची माहिती तो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना देत असतो.  
विक्रम
- सर्वांत वेगवान द्विशतक ठोकणारा इंग्लिश फलंदाज  
- सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धावा  
- सहाव्या विकेटसाठी सर्वांत मोठ्या भागीदारीचा विक्रम  
पुरस्कार  
- क्रिकइन्फो टेस्ट बॅटिंग अवाॅर्ड  
- ५ मॅन ऑफ द मॅच, २ मॅन आॅफ द सिरीज 
बातम्या आणखी आहेत...