आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन कींचा कुटुंबाच्या प्रेमापोटी राजीनामा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन : अनेक नेते सत्ता मिळवण्यासाठी कुटुंबाला सोडतात, पण सोमवारी न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी आपल्या कुटुंबासाठी पंतप्रधानपद सोडण्याची घोषणा केली. त्यांनी पक्षाच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. जॉन की आठ वर्षांपासून पंतप्रधान होते.
साप्ताहिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना अचानक भावुक होऊन ते म्हणाले, कुटुंबाला वेळ देण्यासाठी मी पंतप्रधान आणि पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देत आहे. त्यावर सर्वच स्तब्ध झाले. पत्नीच्या धमकीनंतर त्यांनी राजीनामा दिला, असे आधी माध्यमांनी म्हटले, पण की यांनी ते चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. ते १२ डिसेंबरला औपचारिकरीत्या राजीनामा देतील.

‘न्यूझीलंड हेरॉल्ड’च्या वृत्तानुसार, पंतप्रधान असल्याने आपल्या दोन्ही मुलांच्या आयुष्यात विनाकारण बाह्य दखल आणि तणाव वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधानपद सोडावे, असे पंतप्रधानांच्या पत्नी ब्रोनॉ यांनी त्यांना सांगितले होते. जॉन की यांनीही राजीनाम्याची घोषणा करताना सांगितले की, माझ्या या नोकरीमुळे माझ्या प्रियजनांना थोडेच जास्तीच बलिदान द्यावे लागत आहे. जॉन की ५५ वर्षांचे आहेत. त्यांनी २००८ मध्ये हेलन क्लार्क यांना सत्तेतून हटवून लेबर पार्टीची नऊ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली होती.
सप्टेंबर २०१४ मध्ये नॅशनल पार्टीला विजय मिळवून देऊन ते सलग तिसऱ्यांदा न्यूझीलंडचे पंतप्रधान झाले होते. म्हणाले, माझ्या या नोकरीमुळे माझ्या प्रियजनांना जास्तच त्रास होत आहे
मुलगा मॅक्स म्हणाला, माझे वडील आदर्श पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर जॉन की यांचा मुलगा मॅक्सने लिहिले, ‘माझे वडील आदर्श आहेत.
त्यांनी आपले लहानपणातील स्वप्न पूर्ण केले आणि स्वप्ने पूर्ण केली जाऊ शकतात हे माझ्यासमोर सिद्धही केले.’ शेजारी देशाच्या नेत्यांनीही केली टिप्पणी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जॉन टर्नबुल यांनी ट्विट करून राजीनामा दिलेला नाही असे म्हणावे, अशी टिप्पणी केली. ऑस्ट्रेलियाचेच माजी पंतप्रधान जॉन एबॉट यांनी दोन्ही देशांच्या क्रिकेटमधील स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर म्हटले की, जॉन की यांनी उत्तम खेळी केली आहे.
ऑक्टोबरमध्ये भारतात आले होते
जॉन की याच वर्षी २५ ऑक्टोबरला भारताच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाेबत एनएसजीत भारताच्या प्रवेशाबद्दल चर्चा झाली होती. मोदींनी पाठिंबा मागितला होता आणि त्यांनी आश्वासन दिले होते.
आता पुढे काय होणार?
सत्तारूढ नॅशनल पार्टीची १२ डिसेंबरला विशेष बैठक होईल. त्यात नवा पंतप्रधान कोण आणि पक्षाचा नवा नेता कोण हे निश्चित होईल. उपपंतप्रधान बिल इंग्लिश हे की यांची जागा घेतील, असे मानले जात आहे. बिल अर्थमंत्रीही आहेत. वाणिज्यमंत्री स्टीव्हन जॉयस नवे अर्थमंत्री असू शकतात.
-‘जॉन की यांनी खूप मेहनत करून न्यूझीलंडची सेवा केली आहे. मी त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम भविष्यासाठी शुभेच्छा देतो.’
- अँड्रयू लिटिल, विरोधी लेबर पार्टीचे नेते
-‘मी दररोज जॉन की यांच्या धोरणांशी लढत होते, पण आधी ती आणि पिता असण्याच्या त्यांच्या हक्काचे नेहमीच समर्थन करेन.’
- मॅटेरिया तुरेई, ग्रीन पार्टीचे सहअध्यक्ष
बातम्या आणखी आहेत...