आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New Zealand To Open Door For 750 Syrian Asylum Seekers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुकल्याच्या मृत्यूने हृदयपरिवर्तन; निर्वासितांसाठी दारे उघडली, खेळणी-भोजनही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्युनिच / वेलिंग्टन- चिमुकल्‍या अॅलन कुर्दीच्या मृत्यूनंतर जगभरात वेगळे चित्र दिसू लागले आहे. निर्वासितांना देशात फटकूही द्यायचे नाही, अशी व्यवस्था करू पाहणारे देश आता मात्र त्यांचे स्वागत करू लागले आहेत. त्यांच्यासाठी आपली दारे उघडली आहेत. म्हणूनच गेल्या दोन दिवसांत जर्मनीत १२ हजार निर्वासित दाखल होऊ शकले.न्यूझीलंडमध्ये ७५० सिरियन पोहोचले आहेत. ब्रिटननेही १५ हजार लोकांना आश्रय दिला आहे. फ्रान्सने तशी तयारी दर्शवली आहे. निर्वासितांसाठी भोजन, कपडे आणि मुलांसाठी खेळणीदेखील दिली आहेत.
पोप म्हणाले, किमान एका निर्वासित कुटुंबाला आश्रय द्यावा
पोप फ्रान्सिस यांनी युरोपच्या कॅथोलिक पाद्री वस्त्यांसाठी आवाहन केले आहे. प्रत्येकाने किमान एका निर्वासित कुटुंबाला आश्रय द्यायला हवा. रोममध्ये २५ हजार पाद्रींच्या वस्त्या आणि जर्मनीत हीच संख्या १२ हजारांवर आहे.
ब्रिटनच्या २ हजार नागरिकांकडून आपले घर रेफ्युजी हाऊस म्हणून जाहीर
सिरियाच्या निर्वासितांच्या संरक्षणासाठी एक स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली होती. त्यात दोन हजार ब्रिटिश नागरिकांनी आपले घर रेफ्युजी हाऊस असल्याचे जाहीर करून टाकले. एवढेच नव्हे, तर निर्वासितांचे स्वागत, अशा आशयाचे फलकही ते घरासमोर लावतील.
त्या बाळाचा भार आयुष्यभर कसा वाहू, हेच समजायला मार्ग नाही
तुर्कीच्या किनारपट्टीवर पालथा पडलेल्या चिमुकल्या अॅलनला सर्वात अगोदर तटरक्षक दलाचा सैनिक मेहमत सिपियाकने उचलले होते. रविवारी त्याने पहिल्यांदा मौन सोडले. सिपियाक म्हणाला, मी अॅलनला किनाऱ्यावर पडलेले पाहिले. त्याला पाहिल्यानंतर तो मला माझाच मुलगा वाटला. त्याला उचलताना तो जिवंत असावा, अशीच प्रार्थना मी करत होतो. मी त्याचे शरीर चाचपडून पाहिले. नाडी तपासली. परंतु तशी कोणतीच लक्षणे नव्हती. जड अंत:करणाने त्याला जवळ घेतले. लोक मला विचारत होते, हे हा भार तू कसा वाहशील?
पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटोज....