आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांनी घाबरू नये म्हणून न्यूझीलंड पोलिसांचे नृत्य, समज दूर करण्यासाठी मोहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड (न्यूझीलंड) - न्यूझीलंडमध्ये पोलिस कधीही, कुठेही अचानक लोकांसमोर नृत्य सुरू करतात. हा काही वेडेपणा नाही. लोकांच्या मनात आपल्याबद्दल असलेली भीती दूर करून मैत्री वाढवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पोलिस विनाकारण लोकांना त्रास देतात, अशी न्यूझीलंडमधील बहुतांश लोकांची भावना आहे. विशेषत: रात्री अगदी छोट्या-छोट्या कारणांवरून पोलिस दंडाच्या पावत्या फाडतात, असे लोकांना वाटते. यासाठी पोलिसांनी ‘बियाँड द ब्लू’ मोहीम सुरू केली.

पोलिसांनुसार, पोलिसांचा उद्देश लोकांना घाबरून टाकणे हा नसतोच. मात्र, अनेकदा सुसंवादाअभावी तणावाचे प्रसंग निर्माण होतात. यातून लोकांमध्ये पोलिसांबद्दलची मते कलुषित होतात. आम्ही तुमचे मित्र आहोत, या निळ्या गणवेशामागे तुमच्यासारखाच एक माणूस आहे, हे त्यांना पटवून द्यावयाचे आहे. मग हे साधायचे कसे म्हणून नृत्यासारखे माध्यम पोलिसांनी निवडले. एखादा माणूस आपल्याला घाबरतो आहे, असे वाटल्यास हे पोलिस नृत्य सुरू करतात. विशेषत: रात्री क्लब, बार, रेस्तराँ, मॉल, पार्किंग, लिफ्ट किंवा रस्त्यावर जवान अगोदर मंद संगीत लावून नृत्य सुरू करतात. मग हे पोलिस लोकांना भेटतात. आपण मित्र आहोत हे पटवतात.
या पोलिसांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात पोलिस पार्किंग व लिफ्टमध्ये नृत्य करताना दिसतात. यात महिला पोलिसही आहेत. न्यूझीलंड पोलिसांचे ब्रँड व एंगेजमेंट मॅनेजर जेम्स ह्रिटक म्हणतात, ‘या अभियानातून लोक पोलिसांतील माणूस ओळखू शकतील. लोकांसाठीच आम्ही झटतो हे त्यांना कळायला पाहिजे. पोलिसांमुळे त्यांना अस्वस्थ वाटायला नको.’ ऑकलंडची जेनिफर म्हणते, आम्ही मित्रांसोबत अनेकदा रात्री पार्टी करून घरी परतताना पोलिसांनी अडवले होते. तेव्हा आम्ही घाबरत असू. मात्र, गेल्या काही दिवसांत पोलिस आम्हाला जेंव्हा कधी भेटतात तेव्हा ते अगोदर नृत्यू करतात. हातात हात देतात. आम्ही तुमचे मित्रच आहोत, असे सांगतात.
बातम्या आणखी आहेत...