आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वेटरची वेणी आेढल्याने न्यूझीलंडचे पंतप्रधान गोत्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेलिंग्टन - न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन के यांनी थट्टेने एका महिला वेटरची वेणी आेढली. या प्रकरणाने उग्र रूप धारण केले. शेवटी जॉन के यांना जाहीर माफी मागावी लागली. नोव्हेंबरमध्ये निवडणुकांदरम्यान एका कॅफेमध्ये जॉन के यांनी महिला वेटरची वेणी आेढली होती. त्यानंतरही कॅफेत गेल्यावर त्यांनी अनेकदा त्या महिला वेटरचे लांबसडक केस थट्टेने आेढले. निवडणुकीत के यांच्या नॅशनल पार्टीने विजय मिळवला. के यांना पंतप्रधान पद मिळाले.

त्या महिला वेटरने आपल्या ब्लॉगमध्ये या घटनेचा उल्लेख केला. मी नाराजी दर्शवली तरीही के माझे केस आेढत, असे तिने लिहिले. मार्च महिन्यात तर के यांना मी स्पष्ट नकार दिला. तरीही त्यांनी माझे केस आेढले, असे या महिलेने ब्लॉगवर लिहिले आहे. ग्रीन पार्टीचे नेते मॅतिएरिया तुरई यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. पंतप्रधान कार्यालयातील कर्मचा-यांशी ते कसे वागत असतील व इतर कर्मचा-यांना ते कसा त्रास देतात याचा अंदाज यावरून येतो, असे तुरई म्हणाले. यावर पंतप्रधान कार्यालयातून खुलासा देण्यात आला आहे. त्यांनी केवळ मस्करीने हे कृत्य केले. महिला वेटरला याचा त्रास झाला असल्यास पंतप्रधान जाहीर माफी मागत असल्याचे पत्रक प्रसिद्धीला देण्यात आले. बुधवारी पंतप्रधानांनी स्वत: याविषयी माध्यमांना स्पष्टीकरण दिले. या कॅफेमधील सर्व कर्मचा-यांशी माझे संबंध मैत्रीपूर्ण आहेत, असे ते म्हणाले.

हॅशटॅग टेलगेट, पोनीटेल
ट्विटर, फेसबुक आणि सोशल मीडियावर हॅशटॅग टेलगेट आणि पोनीटेल नावाने या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. वादग्रस्त इंटरनेट दिग्गज किम डॉटकॉमने देखील यावर टिप्पणी केली. इंटरनेट स्वातंत्र्याचा मुद्दाही यानिमित्ताने चर्चेत आला.