आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Newborn Baby Teddy Britains Youngest Ever Organ Donor

PHOTOS: चिमुकल्याला मिळाले अवघे 100 मिनिटांचे आयुष्य, तरी किडनी दान करून झाला अमर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: जेस इव्हान आपल्या जुळ्या मुलं नोआह आणि टेडीसह. हे छायाचित्र जन्मानंतर घेतले आहे.
लंडन - ब्रिटनचा सर्वात छोटा अवयव दान करणारा टेडी शंभर मिनिटे जगला. पण त्या अल्पकाळात तो खूप महत्त्वाचे काम करुन जगाचा निरोप घेतला.त्याने केवळ एक जीव वाचवला नाही, तर त्या संबंधित व्यक्तीसाठी टेडी या चिमुकल्याने सोशल मीडियावर बनवलेल्या पेजवर दानाच्या स्वरुपात 2 हजार 500 पौंड रक्कम जमा केली आहे. त्याची आई जेस इव्हान आणि पिता माइक हस्टन या दोघांना टेडीच्या जन्मापूर्वी त्याच्या स्थितीबाबत पूर्वकल्पना मिळाली होती. डॉक्टरने सांगितले होते, की त्याच्या जुळ्या मुलांपैकी एकाची स्थिती खूपच गंभीर आहे आणि त्याला वाचवणे अशक्य आहे. टेडीला जन्मत:च मेंदूत दोष होता. त्याचे वाचणे अशक्य होते. आई-वडीलांची इच्छा होती त्याचे आयुष्‍य वाया जाऊ नये.म्हणून त्या दोघांनी त्याच्या अंगाचे दान करण्‍याचा निर्णय घेतला.

विद्यापीठ हॉस्पिटल ऑफ वेल्सचे डॉक्टर कार्डिफने 22 एप्रिल 2014, रोजी टेडीच्या मृत्यूनंतर तीन मिनिटानंतर त्याची सर्जरी केली. त्याची किडनी एका मुलाला प्रत्यारोपण करण्‍यात आली. तसेच त्याच्या हृदयाचे व्हॉल्वही दान करण्‍यात आले. जेस आणि माइकने डेली मिररला सांगितले, की आपला मुलगा टेडी खरा हिरो होता.

पुढील स्लाइड्सवर पाहा, टेडी आणि त्याच्या कुटूंबाचे काही फोटोज