मैदुगुरी - नायजेरियात बोको हरम या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात १६ जवानांचा मृत्यू झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या चकमकीतील जवानांचे मृतदेह गुरूवारी आढळून आले आहेत. बोको हरम या संघटनेने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. बोको हरम व इस्लामिक स्टेट या दोन्ही संघटनांनी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे नायजेरियातील हिंसाचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तीन महिन्यांपूर्वी हल्ला झाल्यानंतर मोठी हानी झाल्याचा दावा करण्यात आला होता.