आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2030 पर्यंत जगभरात सरासरी आयुर्मान असेल 90 वर्षे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन  - वर्ष २०३० पर्यंत जगातील बहुतांश देशांमध्ये सरासरी जीवनमान दीर्घ होणार असल्याचा निष्कर्ष एका संशोधनानंतर काढण्यात आला. सरासरी ९० वर्षे वयोमान जगभरात दिसून येईल, असा दावा लान्सेट जर्नलमध्ये प्रकाशित संशोधन अहवालात केला आहे. इम्पीरियल कॉलेज लंडन, जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे संशोधन करण्यात आले. दक्षिण कोरियातील नागरिकांचे सरासरी जीवनमान सर्वाधिक असेल असे यात म्हटले आहे. जगातील आैद्योगिकीकरणात पुढारलेल्या ३५ देशांमधून याविषयी माहिती संकलित करण्यात आली होती.  
 
अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया या विकसित देशांमध्ये दरडोई उत्पन्न अधिक आहे. तसेच वेगाने विकास करत असलेल्या पोलंड, मेक्सिको, चेक रिपब्लिक या देशांमध्ये देखील दीर्घायू लोकांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. 

वर्ष २०३० पर्यंत यात भर पडेल. विविध देशांतील सध्याच्या सरासरी आयुर्मानाची माहिती यात घेण्यात आली. वर्ष २०३० पर्यंत दक्षिण कोरियातील सरासरी आयुर्मान ९०.८ असेल, असे यात म्हटले आहे. 
 
द. कोरियातील आयुर्मान जास्त का ?  
द. कोरियातील आहार सवयी यास कारणीभूत असल्याचे इझ्झाटी यांनी सांगितले. पौष्टिक आहार हे याचे सर्वात मोठे कारण आहे. बालपणापासून मिळणारे पोषण दर्जेदार असल्याने  संख्या येथे अधिक आहे. कमी रक्तदाब, धूम्रपान करण्याचे कमी प्रमाण, आरोग्य सुविधांची सार्वत्रिक पोहोच, वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने होणारे संशोधनांमुळे येथे आयुर्मान अधिक आहे.
 
मुलींचे आयुर्मान मुलांच्या तुलनेत अधिक :   वर्ष २०३० मध्ये द. कोरियात जन्मलेल्या मुलींचे सरासरी आयुर्मान ९०.८ असेल तर मुलांचे ८४.१ वर्षे असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यावेळी जी महिला ६५ वर्षांची असेल तिला आणखी २७.५ वर्षे आयुष्य लाभेल. यापूर्वीच्या संशोधनांमध्ये जगभरात सरासरी आयुर्मानाचा आकडा ९० वर्षे कधीही सिद्ध झाला नव्हता, असे संशोधक प्रो. माजीद इझ्झाटी यांनी सांगितले.  
 
फ्रेंच महिला, स्विस पुरुषांचे आयुर्मानात पुढे 
वर्ष २०३० पर्यंत युरोपात सर्वाधिक सरासरी आयुर्मानात फ्रेंच महिला आणि स्विस पुरुष आघाडीवर असतील, तर श्रीमंत राष्ट्रांमध्ये अमेरिकन यात पिछाडीवर असतील. अमेरिकेत महिलांचे सरासरी आयुर्मान ८३.३ वर्षे तर पुरुषांचे ७९.५ वर्षे असेल. पुरुषांच्या जीवनशैलीत अनेक त्रुटी असल्याने त्यांचे सरासरी आयुर्मान बहुतांश देशात कमी दिसून आले. धूम्रपान, मद्यपान करून ड्राइव्ह केल्याने  रस्ते अपघातात ठार होणाऱ्यांमध्ये पुरुष अधिक आहेत.
बातम्या आणखी आहेत...