आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या सवयी बदलणारा 47वर्षांचा शो; घटते उत्पन्न आणि प्रेक्षकांमुळे निर्मात्यांनी कार्यक्रमाला दिले नवे रूप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेलिंडा लुस्कॉम्ब- अमेरिकेत गेली ४७ वर्षे सुरू असलेला मुलांसाठीचा शैक्षणिक टीव्ही कार्यक्रम - सीसेम स्ट्रीट अनेक दृष्टीने अभिमानास्पद आहे. या शोमध्ये जुलिया या नवीन पात्राला याच महिन्यात तब्बल सहा वर्षांच्या तयारीनंतर सादर करण्यात आले. सुरुवातीला जुलियाला वेबवर एका व्यंगात्मक पात्राच्या रूपात सादर केले जाणार होते. पण १८ महिन्यांपर्यंत डिजिटल स्टोरी बुक आणि अॅनिमेशनमध्ये परीक्षण म्हणून दाखवल्यानंतर तिला कठपुतळी म्हणून या शोमध्ये सादर करण्यात आले. तिच्या टेस्ट रनमध्ये तिला पसंद करण्यात आले. इकडे टीव्ही पाहण्याच्या मुलांच्या सवयीत अालेल्या बदलामुळे या शो समोर काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. 
शोचे निर्माते सीसेम वर्कशॉप यांनी २५० विशेषज्ञ आणि समूहांच्या सूचनांनंतर जुलिया या पात्राला आकार दिला गेला. या शोसाठी दरवर्षी ३० पानांचा अभ्यासक्रम तयार केला जातो. जुलिया स्वमग्नतेच्या  मानसिक आजाराने पीडित आहे. तिच्यावर अनेक शोधप्रबंध लिहिली गेली. स्वमग्न पीडितांसाठी जुलियाचे आगमन ही एक महत्त्वाची घटना आहे. 
 
जुलियाला सादर करणे आव्हानात्मक काम होते. पण सीसेम वर्कशॉपसमाेर याही पेक्षा जास्त कठीण आव्हाने आहेत. मुलांच्या टीव्ही पाहण्याच्या सवयीत बदल होत असल्याने उत्पन्नाचे जुने स्रोेत बंद होत आहेत. सीसेम स्ट्रीटला १० नोव्हेंबर १९६९ पासून अमेरिकेच्या सार्वजनिक टीव्ही पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (पीबीएस)वर दाखवले जात आहे. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी या शोने २०१६ मध्ये एचबीओशी करार केला. आता हा शो पाहण्यासाठी पैसे मोजावे लागतील. 
 
सीसेम स्ट्रीट शो कोणत्या ना कोणत्या पद्धतीने १५० देशांमध्ये प्रसारित केला जातो. इस्रायली शोसाठी अरबी बोलकी बाहुली सादर करण्यात आली आहे. दक्षिण अाफ्रिका, नायजेरियासाठी एचआयव्ही पीडित बाहुली तयार करण्यात आली आहे. अफगाणिस्तानमध्ये टीव्ही पाहणारी ८० टक्के मुले आणि त्यांचे ७० टक्के पालक   बगीचा-ए-सिमसिम (सीसेम गार्डन) शो पाहतात. २०१६ मध्ये मुलींच्या शक्तीचे प्रतीक असलेले जरी नावाचे पात्र सादर करण्यात आले होते. लेबनॉन, इराक आणि सिरीयातील निर्वासित मुलांना शैक्षणिक आणि सामाजिक मदत देण्याच्या सीसेमच्या प्रस्तावाला मेकआर्थर फाउंडेशनच्या दहा कोटी डॉलरचा पुरस्कार असलेल्या स्पर्धेतील अंतिम १० संघटनांमध्ये सामील करण्यात आले आहे. सीसेम स्ट्रीटमधील पात्र आणि आयबीएम वॉटसन काॅम्प्युटर यांच्या वतीने मुलांना शाळेत शिकवण्याच्या योजनेवर काम चालू आहे.  सीसेम वर्कशॉपच्या एच. आर. विभागाच्या प्रभारी शेरी वेस्टिन म्हणतात की, आम्ही बांगलादेशाच्या गावागावात रिक्षातून टीव्ही घेऊन जातो, ज्यामुळे मुलांना सकारात्मक आणि चांगले शिक्षण देता येईल. त्या म्हणतात की, बालपणीच्या गुजगोष्टीत तसेच तेव्हा होणाऱ्या त्रासावर आधारित कार्यक्रमांना मुले चांगला प्रतिसाद देतात. 
 
सीसेम वर्कशॉपने मागील वर्षी आपल्या विदेशातील कार्यक्रमांचा विस्तार करण्यासाठी १४२ कोटींपेक्षा आधिक खर्च केले आहेत. त्यांनी यासाठी सरकार, खासगी कंपन्या आणि संस्थांतून पैसा जमवला आहे. अफगाणिस्तानसाठी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. विदेशामध्ये सीसेमची स्थिती चांगली आहे, पण अमेरिकेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. आता फार कमी मुले  सीसेम स्ट्रीट शो पाहतात. त्यांच्याअगोदर त्यांचे पालक शनिवारी रात्री एक तासाचा शो पाहत होते. आता ते डीव्हीडी शोही खरेदी करत नाहीत. आता इंटरनेटवर आपल्या पसंतीचे कार्यक्रम पाहतात.  सीसेमचे सीईओ जेफ डन म्हणतात की, आता मुले फार बदलली आहेत. कमाईच्या पद्धतीतही बदल आले आहेत.  
 
ही स्थिती पाहून सीसेमने कार्यकमाचा अवधी तासाऐवजी अर्धा तास केला. फक्त इंटरनेटसाठी व्हिडीओ बनवणाऱ्या स्टुडिओची निर्मिती त्यांनी २०१६ मध्ये केली. १९ मार्चपासून जुलिया आणि एल्मो यांच्या एकत्रित खेळण्याची क्लिप युट्यूबवर पाच लाख लोकांनी पाहिली. तसे पाहायला गेले तर मुलांवर केंद्रित इतर चॅनल्स उदा. Ryan’sToyReviewच्या एका क्लिपला दीड कोटीपेक्षा आधिक प्रेक्षक मिळाले हाेते. या क्लिपमध्ये एक छोटा मुलगा खेळण्यांशी खेळत असतो. कॉमन सेन्स मीडियाचे एडिटर इन चीफ जिल मर्फी म्हणतात की, मुलांच्या तुलनेत सीसेमचे शो मंद गतीचे असतात. पण ते सकारात्मक आहेत. यामुळे मुलांचे धैर्य वाढते. 
 
२०१५ मध्ये डनने एचबीओशी करार केला. यात पुढील पाच वर्षांतील निर्मिती खर्च देण्याचा समावेश आहे. प्रश्न हा आहे की, वेगवान आणि हिंसक करमणुकीसाठी प्रसिद्ध वाहिन्या मुलांना बहुतेक लोक निशुल्क पाहू शकतात असे कार्यक्रम का दाखवतात? कारण नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉनही आता मुलांचे शो दाखवत आहे आणि एचबीओ पालकांचे लक्ष वेधून घेत आहे. १३० कोटी रुपये वार्षिक कराराने एचबीओला नऊ महिन्यांसाठी नवे भाग दाखवण्याचा अधिकार मिळालेला आहे. यानंतर गेल्या ५० वर्षांपासून जसा पीबीएस शो चालू आहे, तसा तो दाखवला जाईल.  सीसेमचे सीओओ यंगवुड म्हणतात की, एचबीओशी करार केल्याने आम्हाला काही नवे करण्यासाठी पाच वर्षांचा वेळ मिळेल. सीसेमच्या अधिकाऱ्यांचा असा अंदाज आहे की, बदल केल्यानंतरही सीसेमचे प्रेक्षक संपणार नाहीत. त्यांचा अंदाज बरोबर निघाला. २०१५ च्या तुलनेत पीबीएसचे रेटिंग २०१६ मध्ये १२ टक्के जास्त राहिले आहे.  
 
टीव्ही पाहण्याच्या सवयीत मोठा बदल
सर्व्हे एजन्सी नीलसननुसार २०१५ च्या शेवटच्या तिमाहीत २ ते ११ वर्षांच्या प्रत्येक मुलाने दरमहा अंदाजे ११ तास इंटरनेट व्हिडीओ पाहिले होते. 2016 शेवटी ही वेळ वाढून १५ तास झाली. ही वाढ एका वर्षात ३६ टक्के आहे. या अवधीत टीव्ही पाहण्याची वेळ दरमहा ९० तास होती. यात १० टक्के घट झाली आहे. २०१२ नंतर डिस्ने आणि निकेलोडिओन चॅनलच्या रेटिंगमध्ये सतत घटच झाली आहे. 
 
उत्पन्नात मोठी घट
2008 ते  2016 दरम्यान सीसेम वर्कशॉपची डीव्हीडीतून कमाई ७० टक्के कमी झाली. परवान्यामुळे आणखी ५० टक्के नुकसान झाले. सीसेमचे सीईओ पीटर डन म्हणतात की, आयपॅड आणि स्ट्रिमिंग व्हिडीओमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. १९९० च्या दशकात एल्मोने जसे केले होते, तसे आता कोणतेही पात्र खेळणी बाजारावर आपला प्रभाव टाकू शकणार नाही. कारण मोफत शोची संख्या वाढली. बहुतेक मुले आता आयपॅडवर खेळतात. 
 
सीसेम स्ट्रीट म्हणजे? 
सीसेमस्ट्रीट हा अमेरिकेत १० नोव्हेंबर 1969 पासून टीव्हीवर चालू असलेला मजेदार शैक्षणिक शो आहे. मुलांच्या आवडीच्या या शोमध्ये मुलांना शब्द, अंक आणि रंग ओळखायला शिकवतात. बिग बर्ड हे याचे प्रमुख पात्र आहे. अमेरिकेच्या सार्वजनिक टीव्ही पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, एचबीओ आणि नॅशनल एज्युकेशन टीव्हीवर टेलीविजनवर दाखवला जातो. 
बातम्या आणखी आहेत...