आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज, वायफायमुळे अॅलर्जी, जंगलात मातीचे घर बांधले; वीज, पाणी, फ्रिज, टीव्हीविना राहतेय कुटुंब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमध्ये एक कुटुंब शहरातील सर्व ऐषारामाच्या आणि आधुनिक सुविधा सोडून जंगलात मातीच्या घरात राहत आहे. तेथे त्यांच्याकडे ना वीज आहे ना पाणीपुरवठा. टीव्ही, इंटरनेट, रेफ्रिजरेटर, पंखा यांसारख्या कोणत्याही वस्तू नाहीत. ते १९ महिन्यांपासून येथेच राहत आहे. या सुविधा नसल्या तरी आम्ही आनंदी आणि समाधानी आहोत, असे या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.  

४५ वर्षीय केट, तिचा ४७ वर्षीय पती आणि तीन मुले ऑक्टोबर २०१५ मध्ये शहरातील घर सोडून येथे आली. त्यामागे त्यांची अपरिहार्यता होती. केटला २०१५ च्या सुरुवातीला ‘मल्टिपल केमिकल सेन्सिटिव्हिटी’ नावाचा आजार झाला. तिला विजेचे साहित्य, वायफाय सिग्नल्स, भिंतीच्या रंगाच्या वासाचे वावडे होते. खाण्यापिण्याच्या अनेक वस्तूंत मिळणाऱ्या रसायनांमुळेही ती आजारी पडत असे. ती अंथरुणातून उठूही शकत नव्हती. अनेक डॉक्टरांना दाखवले. सर्वांनी वेगवेगळे निदान केले. कोणी म्हणायचे की जास्त तणाव हे कारण आहे, तर कोणी ‘तीव्र वेदनां’चा साइड इफेक्ट असे सांगायचे. केट त्यांच्याशी सहमत नव्हती. तिच्या पतीने याबाबत संशोधन केले. अशा प्रकरणांचा अभ्यास केला, त्यात यापासून मुक्तता मिळवण्यासाठी जुन्या पद्धतींचा अवलंब करण्यास सांगण्यात आले होते. मग केट आणि अॅलन यांच्या मनात मातीचे घर आणि जगण्याच्या जुन्या पद्धतींची कल्पना आली. अॅलनने सहा आठवड्यांपर्यंत मातीचे घर बनवण्याच्या पद्धतींचा अभ्यास केला. मग चार मित्रांना सोबत घेऊन १.६० लाख रुपयांत ब्रिटनमधीलच छोट्याशा जंगलात घर बनवले. केटने ज्या २१ एकर जमिनीवर हे घर बांधले ती जमीन तिने १० वर्षांपूर्वीच खरेदी केली होती. प्रवासाच्या वेळी ते तिथे मुक्काम करत असत. त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनल्स आहेत. जेव्हा चांगले ऊन असते तेव्हा दिवे लागतात, अन्यथा रॉकेलवरील दिवेच असतात. वनस्पती आणि नैसर्गिक वस्तूंचाच वापर वॉशिंग पावडर आणि शाम्पूप्रमाणे होतो. चांगला प्रकाश यावा म्हणून छतावर कारचे विंडस्क्रीन लावलेले आहे.   
 
केट म्हणते, ‘येथे शिफ्ट झाल्यानंतर काही दिवसांनीच मी बरी होण्यास सुरुवात झाली. आता अगदी ठीक आहे. लोक मला मड वुमन म्हणतात. हे ऐकून आधी वाईट वाटायचे, पण आता नाही. आम्ही सामान्य वस्तूंत आनंद शोधला आहे. सकाळचे ऊन, पक्ष्यांचा आवाज, मातीचा सुगंध आणि कुटुंबीयांसह बराच काळ व्यतीत करत असल्याने आम्ही समाधानी आहोत. आमच्याकडे एक रेडिओ आहे, तोच आम्ही ऐकतो.’  
बातम्या आणखी आहेत...