लिली 71870 मध्ये साल्ट लेक सिटी, अमेिरकेत काही महिलांनी राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले.कारण त्यानी बहुविवाह पद्धतीचे समर्थन केले होते. लोकांना आश्चर्य वाटले कारण आधुनिक समजल्या जाणाऱ्या उटा राज्यातील महिला बहुपत्नीत्वाचे समर्थन कसे करू शकतात? देशभरातील महिलांना मताधिकार लागू करण्याअगोदर सर्वात प्रथम उटा राज्यातील महिलांना मते देण्याचा अधिकार मिळाला होता. त्यावेळी बहुविवाह आणि महिलांचे अधिकार हे परस्पर विरोधी होते. लारेल थॅचर उलरिच यांनी आपले नवे पुस्तक अ हाउस फुल ऑफ फिमेल्स मध्ये त्या महिलांच्या डायऱ्या,पत्रे, कविता आणि त्यांच्या मुलांच्या जन्माच्या वेळा यावर आधारित कालखंडाचे वर्णन त्यात केले आहे.
१८४० मध्ये लेटर डे चर्चचेे संत जोसफ स्मिथ यांनी बहुविवाह पद्धतीचा सिद्धांत लागू केला होता. एका वादग्रस्त चर्चचा हा वादग्रस्त निर्णय होता. १८९० मध्ये चर्चने अधिकृत पद्धतीने बहुविवाह प्रथा रद्द केल्यानंतर उटा हे राज्य बनले. धार्मिक दृष्टीकोनातूनही बहुविवाहावर विश्वास ठेवणारे पुरूष आणि महिलाही ही प्रथा असहज असल्याचे म्हणत होते. इतिहासकार उलरिचने पुस्तकात महिलांच्या पत्राचे बारकाईने वर्णन करून त्यांच्या व्यथांवर प्रकाश टाकला आहे. बहुविवाहाने निर्माण हाेणाऱ्या अडचणंी सांगितल्या आहेत. अ मिडवाइफ्स टेल (१९९०)पुस्तकासाठी पुलित्जर पुरस्कार मिळालेला आहे.