आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक न्याय, समतेसाठी डॉ. आंबेडकरांचे विचार पथदर्शक : अमीना मोहंमद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र- सामाजिक न्याय व समतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्व देशांसाठी पथदर्शक आहेत. नव्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या शक्तीचा उपयोगदेखील याच सूत्राने सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी झाला पाहिजे, असे मत संयुक्त राष्ट्राच्या उपसरचिटणीस अमीना मोहंमद यांनी व्यक्त केले.  

भारताच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूतांच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त  एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अमीना बोलत होत्या. महिला, अल्पसंख्याक, वंचितांच्या हक्कासाठी बाबासाहेब आंबेडकर लढले. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने नव्या तंत्रज्ञानाचाही उपयोग करण्यात यावा. नव्या जगात सामाजिक न्याय व समतेसाठी नवीन डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला पाहिजे. सामाजिक समतेसाठी २०३० ची कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यात आली आहे, असे माेहंमद यांनी सांगितले. दरम्यान, जयंतीच्या कार्यक्रमात मॅसेच्युसेट्स विद्यापीठाचे कुलगुरू अमेर्स्ट कॅथरिन न्यूमन, ज्युलिया ग्लिडन, गुगलचे ऑलिव्हर राबेश्लाग इत्यादी मान्यवरांचीही भाषणे झाले. 
 
एक अब्ज लोकांची डिजिटल आेळख...
डिजिटल आेळख असलेली व्यवस्था गरिबांपर्यंत विविध सरकारी योजना, आर्थिक सुविधांना पोहोचवण्याचे सहजपणे काम करू शकतात. भारतात बायोमेट्रिक आेळखपत्र तयार करण्यात आले आहेत. हे महान उदाहरण ठरू शकेल, असे अमीना मोहंमद यांनी सांगितले. डिजिटल संपर्क व डिजिटल कौशल्ये असलेला कोणत्याही व्यक्तीचे  उच्च जीवनमान होऊ शकते. जीवनमान उंचावण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा असा योग्य वापर व्हायला हवा. तंत्रज्ञानातून मानवी गरजा पूर्ण करणे शक्य होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...