आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतरांवर हल्ल्याच्या योजनेत अमेरिकेची युद्धनौका अपघातग्रस्त, 200 जवान होते झोपलेले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योकोसुका (जपान) - इतर जहाजांचा नायनाट करण्यासाठी निघालेल्या यूएसएस फिट्झगेराल्ड या युद्धनौकेलाच अपघात झाला आहे. फिलिपाइन्सच्या एसीएक्स क्रिस्टल नामक मालवाहू जहाजाने फिट्झगेराल्डला शनिवारी धडक दिली.

अपघातावेळी फिट्झगेराल्डमध्ये नौदलाचे २०० जवान होते. त्यापैकी बहुतांश बेपत्ता होते. पण, रविवारी प्राप्त माहितीनुसार अपघातावेळी बहुतांश जवान झोपलेले होते. घटनास्थळाजवळ काही मृतदेह सापडले आहेत. बचावपथकाने शोधमोहीम थांबवली आहे. किती मृतदेह सापडले हे सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. धडक देणाऱ्या मालवाहू जहाजात २० जण प्रवास करत होते. पण, त्यांच्यापैकी कुणालाही दुखापत झालेली नाही.  
 
नुकसानग्रस्त युद्धपोत यूएसएस : फिट्झगेराल्ड ही लढाऊ युद्धनौका आहे. यात अत्याधुनिक क्षेपणास्त्रे आहेत. ही युद्धनौका अमेरिकेच्या सर्वात बलाढ्य सातव्या तुकडीत सामील करण्यात आली आहे. फिट्झगेराल्डला टगबोट्सच्या मदतीने योकोसुका बंदरापर्यंत आणण्यात आले. जपानी तटरक्षक दलानुसार, अपघातावेळी अमेरिकेची ही युद्धनौका समुद्री वादळात अडकली होती, तर फिलिपाइन्सचे मालवाहू जहाज संपूर्ण नियंत्रणात होते. सातव्या तुकडीचे कमांडर व्हाइस अॅडमिरल जोसेफ पी. ऑकॉइन रविवारी म्हणाले, ही युद्धनौका दुरुस्त होण्यास बरेच दिवस लागतील. अपघातात किती नौदल सैनिक मृत पावले हे सांगण्यास त्यांनी नकार दिला, पण मृतांच्या घरी माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...