आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यात चांगले नेतृत्व करण्यासाठी मुलींनी कमी वयातच नेतृत्वाचे धडे गिरवले पाहिजेत; फेसबुक सीईओंनी दिला सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - मुलींनी कमी वयातच नेतृत्वाविषयी धडे गिरवले पाहिजेत. त्यामुळे त्यांना आयुष्यात चांगले नेतृत्व करता येईल, असे मत फेसबुकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शेरिल सँडबर्ग यांनी व्यक्त केले आहे. ‘आपण मुलींना कमी वयात नेतृत्व न करण्याचा सल्ला देतो; पण त्याविरोधात नेतृत्वासाठी मुलांना प्रोत्साहित करतो, हीच आपली सर्वात मोठी चूक आहे,’ असेही त्या म्हणाल्या. सँडबर्ग यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये असे मत व्यक्त केले आहे.    
 
 
सँडबर्ग म्हणाल्या की, ‘माझ्या मते, प्रत्येक व्यक्तीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. त्यामुळेच कोणाला काय बनायचे आहे, याविषयी लैंगिंक आधारावर न ठरवता, त्याला त्याच्या इच्छेनुसार पर्याय निवडण्याची संधी दिली पाहिजे.’ महिलांचा प्रभाव आणि त्यांच्यातील शक्तीचा सन्मान करण्यासाठी सँडबर्ग यांनी बियोन्सेच्या साँग रन द वर्ल्ड (गर्ल्स)चे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या की, पुरुषाने नेतृत्व करावे असे संपूर्ण जगाला वाटते आणि महिलांकडून त्यांनी दुसऱ्यांचा विचार करावा, अशी अपेक्षा ठेवली जाते. बियोन्सेचे मासिक मुलींसाठी तसेच मुलांसाठीही महत्त्वाचे आहे, महिलादेखील नेतृत्व करू शकतात हे त्यांनाही समजायला हवे.’ या मुलाखतीदरम्यान शेरिल यांनी त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर स्वत:ला कसे सांभाळले याविषयीदेखील सांगितले. दुःखातून सावरण्यासाठी त्यांनी पुस्तकदेखील लिहिले. ‘ऑप्शन बी’ या नावाने लिहिलेल्या या पुस्तकात त्यांनी महिलांच्या संघर्षाच्या अनेक गोष्टींचा समावेश केला आहे.  
 
महिला सशक्तीकरणासाठी लढा देणाऱ्या लाेकांमध्ये सँडबर्ग यांची ओळख आहे. वास्तविक त्यांनी २०१३ मध्ये ‘लीन इन : वुमन, वर्क अँड विल टू लीड’ हे पुस्तक लिहिले हाेते. यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. या पुस्तकात त्यांनी नारी-वादाचे जोरदार समर्थन केले होते. त्यांचा “टेक टॉक’ला ६० लाखांपेक्षा जास्त वेळ पाहण्यात आले आहे. त्या महिलांना जबाबदारी उचलण्यासाठी प्रेरणा देतात. तरुण मुलींनी कशा पद्धतीने “रोल मॉडेल’ बनावे व स्वतला उत्तम कसे सिद्ध करावे याविषयी सल्ला देणारी त्यांनी ‘लीनइनडॉटओआरजी’ या नावाने संस्थादेखील बनवली आहे.
 
महिलाच पुरुषांच्या तुलनेत स्वत:ला कमी समजतात : सँडबर्ग   
फोर्ब्जनुसार सुमारे ११ हजार कोटींचे नेटवर्थ असलेल्या सँडबर्ग यांनी सांगितले की, ‘ज्या वेळी त्या हॉर्वर्डमध्ये शिक्षण घेत होत्या त्या वेळी महिला स्वत:ला पुरुषांच्या तुलनेत कमी समजत असल्याचे दिसून आले. ही गोष्ट महिलांना विकास आणि पगारवाढ जास्त मिळण्यात अडसर ठरते. त्यासाठी सुरुवातीलाच महिलांना चांगला पगार मिळायला हवा. ही बाब समजणारे लोक आणि प्रभावी कॉर्पोरेट धोरण यांची आधी आवश्यकता आहे. तसे पाहिले तर पुरुषांच्या बरोबरीत महिलादेखील नोकरीसाठी अर्ज करत आहेत. कार्यालय चालवण्यातही त्यांची भूमिका बरोबरीत असते. तसेच त्यांचे उत्तरदायित्वदेखील समान आहे. मग पगारात फरक कशाला हवा? या दिशेने गांभीर्याने काम करावे लागेल.’
बातम्या आणखी आहेत...