आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळ स्थानकाजवळ चिनी कोबीचे उत्पादन, लवकरच भाजी-फळ उद्यान उभारण्यासाठी योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाजवळ अंतराळवीरांनी पहिल्या चिनी कोबीचे उत्पादन घेतले आहे. ही पानकोबी आहे, अशी माहिती नासा अर्थात अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने दिली. पिग्गी व्हिट्सन यांनी टोकियो बेकाना चायनीज कोबीचे उत्पादन काढले आहे. त्यासाठी त्यांनी अंतराळ स्थानकाच्या बाहेर महिनाभर कष्ट करावे लागले. कोबीचे हे उत्पादन नासाच्या केनेडी स्पेस सेंटरला पाठवले जाणार आहे.
 
 कोबीच्या नमुन्यांचे शास्त्रीय परीक्षण झाल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अंतराळ स्थानकावर उत्पादन करण्यात आलेले हे पाचवे उत्पादन आहे. अनेक प्रजातीच्या कोबी तसेच पालेभाज्यांची चाचणी घेतल्यानंतर चिनी वाणाची निवड अंतराळातील शेतीसाठी करण्यात आली होती. नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरच्या फूड सिस्टिम टीममध्ये चार उमेदवारांना पाठवण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून टोकियो बेकाना वाणाची निवड करण्यात आली आहे.  

चवीचे परीक्षण महत्त्वाचे  : अंतराळवीरांनी नमुन्यांसाठी आणलेल्या कोबीची चव बघितलेली आहे. आता अंतराळाच्या वातावरणात वाढलेल्या कोबीची चव बदलली असल्यास चिनी कोबीवर काही परिणाम होत अाहे, असे म्हणता येऊ शकेल. त्यासाठी प्रयोगशाळेच्या निष्कर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.  
 
मोठ्या उद्यानाची तयारी  
अंतराळात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवता आल्यास भविष्यात मोठे उद्यान उभारण्याची तयारी करता येऊ शकेल, असा विश्वास संशोधकांना वाटतो. त्यात भाजीपाल्यासह फुला-फळांचाही समावेश आहे.  
 
वातावरणाशी कसे जुळवून घेतात ?  
वनस्पती नेहमीच्या उत्क्रांतीमधील अनुभवाच्या पलीकडे जाऊन नव्या वातावरणाशी वनस्पती कशा प्रकारे जुळवून घेतात ? त्यांचे जीवशास्त्रीय बदल या निमित्ताने जाणून घेता येणार आहेत, असे डॉ. अॅन लिसा पॉल यांनी म्हटले आहे. ते फ्लोरिडा विद्यापीठात अध्यापक आहेत. पृथ्वीच्या बाहेर अशा उत्पादनाची शक्यता पडताळताना अधिक सखोल अभ्यासही या माध्यमातून होणार आहे, असे पॉल यांना वाटते.
बातम्या आणखी आहेत...